मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kiku Sharada: कपिल शर्मा शो फेम पलक आणि जेठालाल यांना कार्यक्रमातून केलेलं रिप्लेस; किकूने सांगितला 'तो' किस्सा

Kiku Sharada: कपिल शर्मा शो फेम पलक आणि जेठालाल यांना कार्यक्रमातून केलेलं रिप्लेस; किकूने सांगितला 'तो' किस्सा

द कपिल शर्मा शो मुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या किकू शारदाचे स्ट्रगलचे दिवस कसे होते माहित आहे का?

द कपिल शर्मा शो मुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या किकू शारदाचे स्ट्रगलचे दिवस कसे होते माहित आहे का?

द कपिल शर्मा शो मुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या किकू शारदाचे स्ट्रगलचे दिवस कसे होते माहित आहे का?

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 03 ऑगस्ट: प्रसिद्ध कॉमेडी स्टार किकू शारदा सध्या बरेच चर्चेत येत आहे. किकूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या स्ट्रगल आणि कामांबद्दल बरीच माहिती दिली आहे. अनेक सिनेमांमध्ये छोटी छोट्या पण लक्षात राहिलेल्या भूमिकेनंतर अखेर कपिल शर्माच्या शो मुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. पण स्ट्रगलच्या काळात त्याला आणि तारक मेहता का उलटा चष्मा मधील जेठालाल यांना एका शो मधून रिप्लेस करण्यात आलं होतं अशी माहिती समोर येत आहे. कपिल शर्मा शो मध्ये कधी पलक तर कधी बच्चा यादव, अतरंगी वकील अशी धमाल पात्र किकू सातत्याने साकारत आला आहे. त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचं वळण कपिल शर्मा शो ने मिळालं. पण एकेकाळी किकू आणि सध्याचा फेमस शो तारक मेहता का उलटा चष्मा फेम जेठालाल म्हणजे दिलीप जोशी या दोघांना एका कार्यक्रमातून रिप्लेस केलं गेलेलं असं किकूने पिकविलाशी बोलताना सांगितलं आहे. तो असं म्हणतो, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी आज के श्रीमान श्रीमती नावाचा एक कार्यक्रम करत होतो. अचानक एक दिवशी आम्हाला येऊन सांगितलं तू आणि दिलीप जोशी दोघांनी उद्यापासून येऊ नका. मला ऐकून धक्काच बसला. त्यांना कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना आत्ताच्या फॉरमॅट मध्ये बदल करून बघायचा आहे. चालू असणारा फॉरमॅट त्यांना पसंत पडत नाहीये पण ते ऐकून मला असं वाटलं की मी जे करतोय ते परिपूर्ण आणि चांगलं नाहीये का? हे ही वाचा- Sunil Grover birthday: कधी गुत्थी कधी डॉ. गुलाटी साकारणाऱ्या सुनीलची नेट वर्थ नेमकी आहे किती? प्रेक्षकांना मी आवडत नाहीये का? मी दिलीप भाईंना कॉल केला. त्यांनी मला समजावलं की हे प्रेक्षकांचं नव्हे तर चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊस यांचं गणित आहे. पण त्यावेळी मला प्रचंड वाईट वाटलं होतं. पण बरोबर तीन महिन्यांनी त्यांनी आम्हाला शो मध्ये परत घेतलं.”
View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

किकूने या मुलाखतीत आयुष्यातील अनेक बाबींवर प्रकाश टाकत स्ट्रगलच्या दिवसांपासून अगदी कपिल शर्मा शो पर्यंत बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या आहेत. किकू सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असतो.
First published:

Tags: Comedy actor, The kapil sharma show, Tv actor

पुढील बातम्या