Home /News /entertainment /

Sunil Grover birthday: कधी गुत्थी कधी डॉ. गुलाटी साकारणाऱ्या सुनीलची नेट वर्थ नेमकी आहे किती?

Sunil Grover birthday: कधी गुत्थी कधी डॉ. गुलाटी साकारणाऱ्या सुनीलची नेट वर्थ नेमकी आहे किती?

सुनील ग्रोव्हर या प्रसिद्ध कॉमेडी स्टारने आपल्या करिअरमध्ये बराच स्ट्रगल पाहिला आहे. एकेकाळी अगदी कमी मानधन असलेल्या या अभिनेत्याचं नेट वर्थ नेमकं किती आहे?

  मुंबई 02 ऑगस्ट: टीव्ही जगतात आपल्या कॉमेडीने लोकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलेला अभिनेता सुनील ग्रोव्हर त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनीलला आजपर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. त्याची प्रत्येक भूमिका आजपर्यंत गाजत आली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याचं (sunil grover) नेट वर्थ नेमकं किती आहे माहित आहे का? हरियाणामध्ये जन्मलेल्या आणि एक कॉमेडी स्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुनीलने सब टीव्हीवरील गुटर गू या सायलेंट मालिकेत केलेला रोल बराच गाजला होता. त्याला खरी ओळख ही कपिल शर्मा शो मध्ये त्याने साकारलेल्या पात्रांनी दिली. मग ते गुत्थीचं पात्र असो किंवा डॉ. मशहूर गुलाटी सगळ्या पात्रांना त्याचा एक हटके टच देऊन सुनील साकारताना दिसतो. एकेकाळी अगदी कमी मानधनात ज्याला तोललं जात होतं असा हा अभिनेता सध्या चिक्कार पैसे कमावतो. एकेकाळी सुनीलची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. त्याचं एकेकाळी मानधन केवळ 500 रुपये होतं. पण सध्या सुनील करोडोंचा मालक आहे. त्याची नेट वर्थ 21 करोड रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. सुनील हा भारतातील टॉपवर असणारा कॉमेडी स्टार आहे. महिन्याला सुनील जवळपास 30 लाख रुपये कमावतो तर अनेक ब्रँडशी संबंधित असलेला हा अभिनेता ब्रँड एन्डॉर्समेंटचे जवळपास एक कोटी रुपये घेतो अशी माहिती समोर येत आहे.
  सुनील मागच्या काळात आरोग्याशी निगडित समस्यांचा सामना करत होता. त्याच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याला इस्पितळात दाखल केलं होतं. सुनीलची एक मोठी हृदय शस्त्रक्रिया झाली असून त्या परिस्थितून तो सुखरूप बाहेर पडला आणि आता तो एकदम ठणठणीत आहे. हे ही वाचा- Alia Bhatt & Ranbir Kapoor: ...अन् मला बघून रणवीरला रडू कोसळलं; आलियानं सांगतला 'तो' किस्सा कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर सुद्धा सुनील बराच चर्चेत राहिला होता. हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याने वेबविश्वात एंट्री केली. सनफ्लॉवर, तांडव अशा सुपरहिट वेबसिरीजमध्ये अत्यंत वेगळ्या भूमिकांमध्ये तो दिसून आला होता.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Birthday celebration, Sunil grover, Tv actor

  पुढील बातम्या