मुंबई, 28 डिसेंबर : कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केल्यावर मलाइका अरोरा (Malaika Arora) आता तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) गोव्यातल्या (Goa) बीचवर सुट्ट्या एन्जॉय करते आहे. मलाइकाची बहीण अमृता अरोरा (Amrita Arora) हीसुद्धा तिच्यासोबत आहे. शनिवारी मलाइकानं तिचा अर्जुन आणि अमृतासोबतचा एक फोटो इन्स्टावर (Insta) शेअर केला. या फोटोमध्ये दोघीजणी बीचवर (beach) निवांतपणे मजा करताना दिसत आहेत. मलाइकाच्या चाहत्यांनी हा फोटो लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून खूप उचलून धरला. दुसऱ्याच दिवशी अमृताही एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये 2 स्टेट्समधला अभिनेता आणि मलाइकाचा बॉयफ्रेंड अर्जुन मलाइकाचे फोटो काढण्यात मग्न झालेला दिसतो आहे. मलाइका बीचवरच्या स्विमिंगपूलमध्ये ग्रीनीश मोनोकीनी आणि ऑरेंज कलरचा श्रग घालून पोज देते आहे.
त्याआधी मलाइकानं बहीण अमृतासोबत गोव्यात विविध ड्रिंक्स एन्जॉय करतानाचा फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिनं म्हटलं, ‘सनशाइन ड्युओ…’ सोबतच sunnydaysarehereagainअसा हॅशटॅगही तिनं दिला आहे.
मलाइका आणि अर्जुन यांनी नुकतंच धरमशाला इथं दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या. बॉलिवूडचं कूल कपल सैफ अली खान आणि करिना कपूर हे दोघेसुद्धा त्यांच्यासोबत होते. अर्जुन आणि सैफ तिथं आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’चं शूटिंग करत होते. त्या निमित्ताने करिना आणि मलायका दोघीही धरमशालाला गेल्या होत्या. करिश्म-करिनाच्या घट्ट मैत्रिणींमध्ये मलायकाचा समावेश आहे. या तिघींचे एकत्र धमाल करतानाचे अनेक फोटो त्यांनी स्वतःच शेअर केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलाइकानं हेसुद्धा सांगितलं, की तिनं लॉकडाऊनचा काळ अर्जुनसोबत घालवला. अर्जुनमुळं हा काळ तिला कंटाळवाणा न होता खूप खास गेला. तिनं सांगितलं, की अर्जुन खूप एंटरटेनिंग आहे. त्याच्यासोबत घालवलेला कुठलाच क्षण रटाळ नसतो. अनेकदा तो माझी मजा घेतो, पण तेही आनंद देणारं असतं.’

)







