मुंबई, 11 जून: सब टीव्हीवर (Sab TV) 2008 पासून सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका आजही लोकप्रिय आहे. गोकुळधाम (Gokul Dham) नावाच्या एका सोसायटीतील वेगवेगळ्या जातीधर्माचे, वृत्तीचे लोक एकमेकांना कसे मदत करतात, त्यांची मैत्री, शत्रुत्व, त्यांच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी याचं विनोदी ढंगानं सादरीकरण करणारी ही मालिका उत्तम कलाकार आणि कथानकातील ताजेपणा यामुळं घराघरात पोहोचली आहे. ही मालिका गुजराती लेखक तारक मेहता यांनी लिहलेल्या कथानकावर आधारीत आहे. यातलं प्रत्येक पात्र भारतातल्या घराघरात परिचित आहे. दिलीप जोशी, दया वाकानी, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी, मूनमून दत्ता, नेहा मेहता असे अनेक कलाकार या मालिकेसाठी ओळखले जातात. गेली अनेक वर्षे एखाद्या कुटुंबासारखे लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील काही कलाकार यातून वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले. काही परत आले. या मालिकेत 12 वर्षे अंजलीची भूमिका साकारणारी नेहा मेहताही (Neha Mehta) गेल्या वर्षी बाहेर पडली होती, त्यामुळं चाहते नाराज झाले होते. त्यानंतर ती पुन्हा येणार अशी चर्चा होती; पण तसं घडलं नाही. हे वाचा- सुशांतवर रुसल्या होत्या ‘श्रीकृष्णा’च्या मुली, अभिनेत्याने अशी केली मनधरणी आता प्रेक्षकांची आवडती अंजली मेहता अर्थात नेहा एका गुजराती चित्रपटातून (Gujrati Film) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे तिच्या मालिकेत परत येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर नेहानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे तिला आपण आणखी काहीतरी करू शकतो याचा शोध लागला आहे. आता ती चित्रपटात काम करणार आहे. त्यानुसार तिनं गुजराती चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं असून, तिचा पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महिला सक्षमीकरणावर (Women Empowerment) आधारित या गुजराती चित्रपटात नेहा एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या आधी तिनं ईएमआय (EMI) या हिंदी चित्रपटात काम केलं होतं. यात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. यानंतर तिला तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मिळाली होती. सुरुवातीला अंजली मेहताची भूमिका आपण करू शकू का याबद्दल ती साशंक होती; पण तिनं अतिशय उत्तमपणे ती भूमिका साकारली. हे वाचा- मुंबईच्या पावसात राखीचा भन्नाट डान्स; नेटकऱ्यांना भावतोय अभिनेत्रीचा बिनधास्त… तिनं ही मालिका सोडल्यानंतर गेल्या वर्षीपासून सुनयना फौजदार अंजलीची भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सुनयना अंजली मेहताची भूमिका उठावदार करत आहे. चाहत्यांनाही तिचं काम आवडत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.