मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tejaswini panditने मागितली चाहत्यांची माफी; काय आहे कारण?

Tejaswini panditने मागितली चाहत्यांची माफी; काय आहे कारण?

Tejaswini panditने मागितली चाहत्यांची माफी

Tejaswini panditने मागितली चाहत्यांची माफी

आपल्या अदांनी आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit)हिने अचानक आपल्या सोशल मीडियावर माफीनामा (tejaswini pandit says sorry to users)सादर केला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 8 ऑक्टोबर: आपल्या अदांनी आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit)हिने अचानक आपल्या सोशल मीडियावर माफीनामा (tejaswini pandit says sorry to users)सादर केला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. याच उत्सवाचे औचित्यसाधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री 9 दिवस विविध देवींची रुप धारण करत हटके फोटोशुट करत असतात. मात्र, यंदा तेजस्विनी पंडित कुठेतरी गायब असल्याचे पाहायला मिळाले. तेजस्विनी सलग तीन वर्ष निरनिराळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. या वर्षी तेजस्विनी काय वेगळं करणार याकडे चाहत्यांचा लक्ष लागले होते. परंतु, तेजस्विनी कुठे दिसलीच नाही.

Image

याचकारणास्तव तिने सोशल मीडियावर माफीनामा सादर केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तेजस्विनीने लिहिले आहे की, 'नमस्कार! कसे आहात? सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार आणि माफी सुद्धा! आभार तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल की गेल्या तीन वर्षांप्रमाणे याही वर्षी मी नवरात्री निमित्त खास फोटो, संदेशांच्या माध्यमाने तुम्हाला भेटायला येईन. पण माफी यासाठी की ते या वर्षी शक्य झालं नाही.'तसेच तिने तिच्या निर्मिती संस्थेच्या कामात व्यग्र असल्याचे म्हटले आहे.

'तु ही रे' या चित्रपटातील 'गुलाबाची कळी' या गाण्यामुळे तेजस्विनी विशेष लोकप्रिय झाली. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असणारी तेजस्विनी कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेकदा तेजस्विनी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.

‘तेजाज्ञा’ हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून लाँच केला आहे. तरुणांमध्ये हा ब्रँड चांगलाच लोकप्रिय आहे.

गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. उत्तम अभिनेत्रीबरोबरच डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ती ओळखली जाते. रंगभूमीवरल्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची ती मुलगी. पण आईच्या पुण्याईवर या क्षेत्रात येण्यापेक्षा ती स्वत: या क्षेत्रात संघर्ष करत आली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Navratri, Tejaswini pandit