मुंबई 22 मे: अभिनेत्री तेजस्विनी पंडित
(Tejaswini Pandit) मराठीतली एक आघाडीची नटी म्हणून ओळखली जाते. 23 मे
(Happy Birthday Tejaswini Pandit) रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्ट्रगलच्या दिवसांचा ती आवर्जून उल्लेख करते. तिच्या एका मुलाखतीमधला छोटासा भाग सध्या खूप चर्चेत आहे. तेजस्विनी आत्ता जितकी रोखठोक आणि बिंधास्त आहे तितकाच तिच्या आयुष्यात तिने खडतर काळही पाहिला आहे. तिची आई ज्योती चांदेकर या सुद्धा मराठीमधल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवरच्या कानाला खडा मालिकेत चाहत्यांची लाडकी तेजू आपल्या करिअरच्या आणि आयुष्याच्या कठीण काळाबद्दल बोलताना दिसली.
(tejaswini pandit struggle)
तेजूने यात असं सांगितलं की, "एक वेळ अशी होती की घरात फक्त एक रुपया शिल्लक होता. घरात फक्त पिठीसाखर आणि मैदा सोडता काहीच खायला नव्हतं. तेव्हा स्टोव्हवर मैद्याची बिस्किटं बनवून आम्ही जेवलो आणि रात्र तशीच काढली." हे सांगताना ती खूप भावुक झाली होती.
वाचा-
'... आणि नवी सुरुवात',अभिनेता सुबोध भावेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष
ती पुढे असं म्हणते की, "आमच्यावर बरंच कर्ज होतं आणि ते फेडायला पैसे नव्हते. तेव्हा आमच्या घराची वीज कापली होती. अडीच महिने आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात काढले. त्यावेळी मी ठरवलं की कष्ट करून ही परिस्थिती बदलली पाहिजे. मी त्याकाळात लावणीचे प्रयोग करायचे त्याचे थोडेफार पैसे मिळायचे. एका नाईटवेअर कंपनीची जाहिरात करून चांगले पैसे मिळाले. ते पैसे आल्यावर मी पहिले वीजबिल भरलं."
तिच्या अभिनयातल्या स्ट्रगलबद्दल ती सांगते, "माझी आई त्याकाळात आघाडीची अभिनेत्री होती पण तरीही मला या क्षेत्रात यायला बराच स्ट्रगल करायला लागला. माझी आई रंगभूमी कलाकार असल्याने त्यावेळी नुकत्याच आलेल्या टीव्ही आणि इतर माध्यमांसाठी मला बरीच खटपट करावी लागली."
वाचा-
Twitter वर ट्रेंड होतेय Tejaswini Pandit, काय आहे कारण?
तेजस्विनीचा अंदाज हा खूप कणखर आणि रोखठोक आहे. तिच्या भूमिकांमधूनही तो बराच जाणवतो. तिने साकारलेल्या सिंधुताई सपकाळ आजही अनेकांना प्रेरणा देतात. या चित्रपटात सिंधुताईंच्या तरुणपणीची भूमिका तेजस्विनीने तर मोठेपणीची भूमिका तिची आई ज्योती चांदेकर यांनी साकारली आहे. स्वतःला चॅलेंज देत प्रेक्षकांना दरवेळी काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न तेजस्विनी करत आली आहे.
तिने स्वबळावर चालू केलेला तेजाज्ञा ब्रँड असुदे किंवा अगदी आत्ता तिने निर्मिती क्षेत्रात केलेलं पदार्पण असुदे वेगवेगळ्या भूमिकांमधून ती समोर येते आणि तिच्या प्रत्येक कामात ती यशस्वी होते. तिची नुकतीच रानबाजार नावाची वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाली. त्यातील तिच्या बोल्ड भूमिकेवरही बरीच टीका झाली. पण त्यावर तिने घेतलेली ठाम भूमिका तिच्या कणखरपणाची सार्थ देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.