जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण

‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण

‘अनुराधा’ सापडली अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण

‘अनुराधा’ ही मराठी वेबसीरिज बोल्ड पोस्टरमुळे अडचणीत आली आहे. थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निर्मात्यांकडे याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 28 डिसेंबर - मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’  (anuradha) ही सात भागांची वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. आता याच वेबसीरिजच्या प्रमोशनासाठी संपूर्ण  पुणे शहरात याचे पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवरून ही वेबसीरिज अडचणीत आली आहे. या पोस्टरसंबंधी आलेल्या तक्रारींचा विचार करता या प्रकराची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakanka)  यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबच निर्माते संजय जाधव यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अॅड. जयश्री पालवे यांची तक्रार नेमकी काय आहे? या पोस्टवर अॅडव्हकेट जयश्री पालवे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, हे पोस्टर सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी “धूम्रपान बंदी"असताना यामध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करीत हातात पेटती सिगारेट घेतली आहे. महिलेचे असे ओंगळवाने प्रदर्शन करणे योग्य आहे का? राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी. त्यांच्या या ट्वीटची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्वरीत दखल घेतली आहे. वाचा- दिशा पटानीच्या रेड बिकिनी लुकने सोशल मीडियावर लावली आग! रूपाली चाकणकर यांनी नेमके काय म्हटले आहे ? अॅड. जयश्री पालवे यांच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. याची दखल घेत त्यांनी ‘अनुराधा’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. या ट्वीटसोबत त्यांनी याची प्रत देखील जोडली आहे.

जाहिरात

‘अनुराधा’ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वाचा- ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचं झालं लग्न राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ऑक्टोबर महिन्यात महिला आयोगाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून महिला आयोग गतीमान पद्धतीने काम करत आहे. महिलांच्या तक्रारीनंतर त्यांना न्याय देण्यासाठी आयोग तात्काळ पावलं उचलत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात