मुंबई, 28 डिसेंबर - दिशा पटानी (Disha Patani) नेहमीच तिच्या फिटनेस आणि लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. दिशा नेहमीच तिच्या चित्रपटांविषयची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच दिशाने तिच्या ‘योद्दा’ (Yodha) या सिनेमाच्या टीमसोबतचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. आता दिशाने बिकिनीमधील काही समुद्रकिनाऱ्याचे बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर आग लावली आहे. हे फोटो बघता बघता व्हायरल होत आहेत. लाल बिकिनीत दिशाचा हॉट आणि सेक्सी अंदाज चर्चेत दिशाने तिच्या इन्स्टावर लाल रंगाच्या बिकिनीच तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटो तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी दिशाने हे फोटो काढले आहेत. या फोटोत तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही मात्र तिच्या बोल्ड अदांनी चाहते मात्र घायाळ झाले आहेत. या फोटोत देखील तिच्या फिटनेसची चर्चा होत आहे. वाचा- घटस्फोटाच्या घोषणेनंतर पहिल्यांदा समोर आले Samanthaआणि Naga दिशाच्या चाहत्यांकडून फोटोवर कमेंटचा वर्षाव दिशाच्या चाहत्यांकडून फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरूच आहे. काहींनी या फोटोवर फायर इमोजी तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केली आहे. यापूर्वी दिशाने तिच्या ‘योद्धा’ सिनेमाच्या टीमसोबतचा ग्रुप फोटो शेअर केला होता. या फोटोत तिचा कोस्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि सिनेमाची संपूर्ण टीम दिसत आहे. दिशाने तिच्या ‘योद्धा’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. याची माहिती देखील तिनं सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत दिली आहे.
11 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा होणार प्रदर्शित धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘योद्धा’ चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा करत आहेत. पुढील वर्षी 11 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून पाकिस्तानवर आतापर्यंत हाती घेतलेल्या सर्वात धाडसी मोहिमेची कथा दाखवण्यात येणार आहे.