जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / निळू फुलेंची भेट ठरली टर्निंग पॉईंट, सामान्य कुटुंबातील मुलगी बनली अभिनेत्री, Video

निळू फुलेंची भेट ठरली टर्निंग पॉईंट, सामान्य कुटुंबातील मुलगी बनली अभिनेत्री, Video

निळू फुलेंची भेट ठरली टर्निंग पॉईंट, सामान्य कुटुंबातील मुलगी बनली अभिनेत्री, Video

सामान्य कुटुंबातील तेजश्री ठाकूर तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. तिच्या हा प्रवास कसा झाला जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 1 मे :  कामाला कलेची जोड असली की आयुष्य समृद्ध होत. हेच तत्व सर्व कलाकार मंडळी अगदी प्रामाणिकपणे पाळत असतात. अभिनेत्री तेजश्री ठाकूर हिने तर बालपणापासूनच हे तत्व पाळले आहे आणि आपल्या कलेची आवड जोपासली आहे. यामुळे मोजकेच पण दर्जेदार नाटक आणि विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तेजश्री घराघरात तिच्या अभिनयामुळे पोहोचली आहे.  तेजश्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो ती सातत्याने पोस्ट करत असते. चला तर मग जाणून घेऊया तेजश्री ठाकूर बद्दल.   घरच्यांचा पाठींबा  तेजश्री ठाकूर मूळची मुंबईमधीलच. एका सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. तेजश्रीने मुंबईतील प्रसिद्ध रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतले. भरतनाट्यम मधील अरंगेत्रम ही सर्वोच्च पदवी संपादित केल्यानंतर तेजश्रीची पावले बालनाट्याकडे वळली. नृत्य नाट्य या क्षेत्रात आपली मुलगी छान रमते हे तिच्या पालकांनी अचूक ओळखून तेजश्रीला अभिनय क्षेत्रात करिअर करण्यास पाठिंबा दिला.

News18लोकमत
News18लोकमत

मालिका विश्वात पदार्पण एका सामान्य कुटुंबात कला क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना पदवीचे शिक्षण घेत असतना तेजश्रीने मालिका विश्वात पदार्पण केले. मेरी आवाज ही मेरी पहचान है या हिंदी मालिकेत मेघा या नकारात्मक भूमिकेतून यशस्वीपणे तेजस्वी संपूर्ण घराघरात पोचली आणि प्रेक्षकांच्या आवडीची झाली. तसेच सीआयडी, जिजामाता, क्रिमिनल अशा अनेक हिंदी मराठी मालिकातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. लवकरच मालिका, जाहिरात नाटक किंवा चित्रपटातून प्रेक्षक वर्गाला भेटण्यास ती उत्सुकत आहे आणि काही उत्तम प्रकल्पावर ती काम करत आहे. निळू फुलेंकडून थाप इयत्ता सातवीचे शिक्षण घेत असताना ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची भेट तेजश्री सोबत झाली. तेजश्रीच्या घरात ही भेट झाल्याने तेजश्रीने आपली पारितोषिक अभिनेते निळू फुले यांना दाखवली. त्यावेळी निळू फुलेंनी शाब्बासकीची थाप म्हणून तू एक मोठी अभिनेत्री होशील असं तेजश्रीला सांगितलं आणि कळत नकळत तेजश्री अभिनयाच्या क्षेत्राकडे वळली आणि गेल्या आठ नऊ वर्षांपासून तेजश्री या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

dr Amol Kolhe injured : डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत, ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान दुर्घटना

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घरोघरी  नऊ ते पाच या वेळेत मला काम करायचं नव्हतं आणि त्यातच कोविडमुळे लॉकडाऊन लागलं आणि अशावेळी आई-वडिलांकडून पैसे मागायला आवडत नव्हतं. त्यावेळी मी मुंबईतील भायखळा परिसरात सर्वेची काम केले. त्यावेळी दिवसाला दोनशे टार्गेट असताना पन्नासही सर्वे मोठ्या मुश्किल होत असतं असा अनुभवही तेजश्रीने सांगितला. हिंदी मालिका पेक्षा मी मराठी मालिकांमधून जास्त प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचले, असंही तेजश्रीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात