जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / dr Amol Kolhe injured : डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान दुर्घटना

dr Amol Kolhe injured : डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान दुर्घटना

अमोल कोल्हे यांना दुखापत

अमोल कोल्हे यांना दुखापत

dr Amol Kolhe injured : महानाट्याचा प्रयोग करत असताना घोड्यावरून एन्ट्री होती, त्यादरम्यान दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे : डॉ. अमोल कोल्हे हे सध्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगामुळे महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. त्यांचे प्रयोग वेगवेगळ्या जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडत असतानाच एक मोठी दुर्घटना घडली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना प्रयोगादरम्यान दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. रविवारी रात्री प्रयोग सुरू होता, सगळं काही सुरळीत सुरू असताना डॉ. अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होती. त्याच दरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाली. महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

News18

घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला त्यामुळे पाठीला जर्क बसून दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. पाठीला दुखापत झालेली असतानाही त्यांनी हा प्रयोग पूर्ण केला. पुढचे प्रयोग मात्र सध्या होणार नाहीत. अमोल कोल्हे लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

‘सैराट’ला झाले सात वर्षे आणि आर्चीने शेअर केले परशासोबतचे रोमॅंटिक फोटो

शिवपुत्र संभाजी या नाटकाने फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्यांच्या जवळपास सगळ्याच प्रयोगांना चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या या नाटकाची खूप चर्चा होत आहे. 1 मे रोजीचा प्रयोग संपल्यानंतर ते मुंबईत येऊन उपचार घेणार आहेत. त्यानंतर 11 मे पासून पुन्हा नाटकाचे प्रयोग सुरू करतील अशी माहिती मिळाली आहे.

इन्स्टा पोस्ट शेअर करत फॅशन डिझायनरने संपवलं आयुष्य, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

१ मे हा महाराष्ट् राज्याचा स्थापना दिवस असल्याने या दिवसाचे औचित्य आणि महत्व वेगळं आहे. त्यामुळे दुखापत झाली असली तरी १ मे रोजीचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात