मुंबई, 30 एप्रिल: 90 आणि 2000 चे दशक या काळात बॉलिवूडमध्ये वेगवेगळे प्रयोग झाले असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी चित्रपटांपासून त्यातील गाण्यांपर्यंत विविध गोष्टी बॉलिवूड प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. दरम्यान या काळात काही सुपरहिट गाणी देणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाबाबतीत एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पॉप सिंगर TAZ (Taz from Stereo Nation) अर्थात तरसमे सिंग सैनी (Tarsame Singh Saini) याचे 29 एप्रिल रोजी निधन (Tarsame Singh Saini aka TAZ death) निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी ताजने या जगाला अलविदा म्हटले आहे. नव्वदच्या दशकात TAZ ने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. या गाण्यावर त्याने अनेकांना थिरकायला भाग पाडले होते. ‘नचांगे सारी रात सोन्यो वे..’ ने त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली होती. हृतिक रोशनवर चित्रित झालेले ‘इट्स मॅजिक’ हे गाणं आजही अनेकांना डान्स करायला भाग पाडतं. हे वाचा- जाहीर निषेध!‘महाराष्ट्रात राहून मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावं लागतं…‘अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत मीडिया अहवालांनुसार, काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती. रिपोर्ट्सनुसार तो हर्नियामुळे त्रस्त होता. अशीही माहिती समोर आली आहे की दोन वर्षांपूर्वीच त्याची सर्जरी होणार होती, मात्र कोरोना पँडेमिकमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर तो कोमामध्ये होता मात्र काही दिवसांपूर्वीच कोमामधून तो बाहेर आला. मार्च 2022 मध्ये TAZ ला कोमातून बाहेर काढण्यात यश आले होते. त्यानुसार या गायकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून येत आहे. त्यावेळी TAZ च्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार देखील मानले होते.
बॉलिवूडमध्ये पॉप कल्चर प्रसिद्ध करण्यात TAZ याचाही वाटा आहे. ‘नचांगे सारी रात’, ‘गल्ला गोरियाँ’, ‘दारु विच प्यार’ ही त्याची काही प्रसिद्ध गाणी आहेत. 2003 साली आलेल्या ‘कोई मिल गया’ मधील TAZ च्या ‘इट्स मॅजिक’ गाण्याने अनेकांना थिरकारयला भाग पाडले होते.