TMKOC मधील बबिताच्या फोटोवर टप्पूने केली अशी कमेंट, नेटकऱ्यांनी TVच्या अर्जुन-मलायकाची दिली उपमा
Tarak Mehta Ka Oolta Chashmah: अभिनेत्री मुनमुन दत्ता अर्थात बबीताजी हिने इन्स्टाग्रामवर एक स्टनिंग फोटो शेअर केला आहे. मात्र त्यावर या मालिकेतील टप्पूने केलेल्या कमेंटमुळे दोघांनाही ट्रोल केलं जात आहे.
मुंबई, 02 डिसेंबर: तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta ka Oolta Chashmah) ही मालिका टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिंकापैकी एक आहे. या मालिकेतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सेटवरील मजामस्ती करतानाचे व्हिडीओ-फोटोज देखील हे कलाकार शेअर करत असतात. दरम्यान या शो मध्ये बबिता (Babitaji) ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या फॅशनिस्टा लुकमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता मुनमुन आणि राज अनाडकट (Raj Anadkat) यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. राज अनाडकट तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये टप्पूची (Tappu) भूमिका साकारतो. नेटिझन्सनी दोघांना टेलिव्हिजन विश्वाचे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अशी उपमा दिली आहे.
मुनमुनने अलीकडेच काही स्टनिंग फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या 'देसी लुक' मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिचा सहकलाकार असणाऱ्या राजने या फोटोवर कमेंट केली. त्याने कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान नेटिझन्सना ही बाब काही रुचली नाही. त्यांनी राज आणि मुनमुन यांना टेलिव्हिजन विश्वाचे अर्जुन आणि मलायका म्हटले आहे. अर्जुन देखील मलायकापेक्षा लहान असल्याने अशाप्रकारे उपमा देण्यात आली आहे. सेटवर आणि कामाव्यतिरिक्त राज आणि मुनमुन यांच्यामध्ये खास मैत्री आहे.
मुनमुन अर्थात बबीबा जी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. नुकतेच अभिनेत्रीने गोल्ड ग्लॅम अॅड स्टाइल अवॉर्ड (Gold Glam ad Style awards) मधील एक फोटो शेअर केला आहे. Woman Of Substance ही ट्रॉफी हातात घेऊन तिने फोटो पोस्ट केला आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही अनेकांची आवडती विनोदी मालिका आहे. या मालिकेने नुकतेच 3000 भाग पूर्ण केले आहेत. टीआरपी च्या रेसमध्ये देखील ही मालिका अव्वल क्रमांकावरच असते.