मुंबई, 01डिसेंबर: झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ (Lagira Jhala Ji) ही मालिका तुफान हीट झाली होती. त्यातली अजा (Nitish Chavan) आणि शीतली (Shivani Bavkar) यांची जोडी प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. सध्या हे तुमचे लाडके कलाकार काय करत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'चाहूल' (Chahul) असं या गाण्याचं नाव आहे. या व्हिडीओमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दिसली आहे.
चाहूल या गाण्याचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. अत्यंत कमी काळात या व्हिडीओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. म्युझिक लेबलचं हे पहिलंवहिलं गाणं आहे. अभिजित आणि विश्वजित यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. आणि ओंकार मानेनं या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. विजय भाटे या गुणी गायकाने हे गाणं गायलं आहे. गाण्याचे बोल राहुल थोरात यांचे असून संगीतकार आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
‘लागीरं झालं जी’ या मालिकेचा विषय अतिशय वेगळ्या धाटणीचा होता. त्यातली शिवानी आणि नितीशची फ्रेश जोडीही प्रेक्षकांना आपलीशी वाटली. आता हे गाणंही रसिकांना आवडेल अशी भावना म्युझिक व्हिडीओच्या निर्मात्यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.