जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तारक मेहता'मध्ये दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? स्पेशल एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता

'तारक मेहता'मध्ये दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? स्पेशल एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता

'तारक मेहता'मध्ये दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? स्पेशल एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ देखील लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आली आहे. यामुळे आनंदात असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑगस्ट : लॉकडाऊन काळात सिनेमा-सीरियल्सचे शूटिंग बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना रिपीट मालिका पाहाव्या लागत होत्या. दरम्यान देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Oolta Chashma) देखील लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आली आहे. नवीन एपिसोड्स सुरू झाल्यानंतर प्रेक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही मालिका केवळ टेलिव्हिजन जगतातच नाही तर सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. यातील कलाकारांनी प्रत्येकाची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल स्थानावर आहे. दरम्यान हा शो सुरू झाल्याच्या आनंदात असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. यातील दयाबेन अर्थात दिशा वकानी मालिकेमध्ये पुन्हा परतण्याची शक्यता आहे. (हे वाचा- सुशांत व दिशा प्रकरणात सूरज पांचोलीने सोडलं मौन; तीव्र शब्दात व्यक्त केला संताप ) येणाऱ्या काही दिवसात तारक मेहताच्या काही एपिसोडमध्ये रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. यातील स्पेशल एपिसोडसाठी दिशा वकानीची एंट्री केली जाऊ शकते. याबाबत मालिकेच्या मेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. मात्र सोशल मीडियावर ‘दयाबेन’ परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज तक ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. (हे वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण CBI च्या हाती, केंद्राकडून नोटिफिकेशन जारी ) दीर्घ काळापासून दिशा या मालिकेमध्ये दिसली नाही आहे. याआधी देखील या मालिकेत काम करणाऱ्या जेनिफरने असे संकेत दिले होते की लवकरच दिशा या मालिकेत परतू शकते. तिने अशी माहिती दिली होती की, सध्या दिशाची प्राथमिकता तिची मुलगी आहे त्यामुळे मालिकेसाठी तिच्यावर दबाव टाकणे चुकीचे होईल. गेल्या 2 वर्षांपासून दिशाबाबत सस्पेन्स कायम आहे. दयाबेनला रिप्लेस केले जाईल अशा चर्चा देखील काही काळासाठी होत होत्या. दरम्यान चाहत्यांची पसंती मात्र त्यांच्या आवडत्या दिशा वकानीलाच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात