• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीने सोडलं मौन; तीव्र शब्दात व्यक्त केला संताप

सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीने सोडलं मौन; तीव्र शब्दात व्यक्त केला संताप

भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सुशांत व दिशा प्रकरणात सुरज पांचोलीचं नाव घेतलं होतं

 • Share this:
  मुंबई, 5 ऑगस्ट : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचं नाव घेतलं जात आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवड्यापूर्वी दिशाने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. या दोन्ही प्रकरणांचा संबंध असल्याचे काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे. शिवाय दिशा प्रकरणात सूरज पांचोली यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. अखेर सुरजने सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याने या प्रकरणात पुढे येऊन आपलं म्हणणं मांडलं आहे. त्याने अत्यंत कडक शब्दात आपला विरोध व्यक्त केला. तो म्हणाले जो फोटो मीडियात दाखवला जात आहे तो त्यांची मैत्रिण अनुश्री गौरचा आहे जी भारतात राहत नाही. या प्रकरणात माझं नाव घेऊन माझा छळ केला जात आहे. मी माझ्या जीवनात दिशाला पाहिलंही नाही आणि तिला कधी भेटलोही नाही.
  सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही अनेकदा सूरज पांचोलीचं नाव घेण्यात आलं आहे. त्यावर ही तो व्यक्त झाला आहे. विनाकारण सुशांतच्या प्रकरणात त्यांच नाव खेचलं जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. सांगितले जात आहे की सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस पूर्वी सूरज पांचोलीने घरी पार्टी दिली होती. भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत आरोप केला आहे. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हा धक्कादायक आरोप केला आहे. ते म्हणाले होते की, अधिकाऱ्यांनी त्या लोकांची चौकशी करायला हवी जे सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवसापूर्वी सूरज पांचोलीच्या घरी पार्टीत सहभागी झाले होते. नारायण राणेंचे गंभीर आरोप सुशांतची मॅनेजर दिशा सलियन होती. तिने आत्महत्या केली. पण या आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिचा बलात्कार  झाला आहे, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. '8 तारखेला पंचोलीच्या घरी पार्टी झाली होती. या पार्टीला कोण कोण होतं, त्यांची नाव का समोर आली नाही. त्यांना अटक का झाली नाही?' असे सवाल राणेंनी उपस्थितीत केले. 'सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. त्यानंतर घरातील नोकरा दोन तासाने कळलं की, त्याने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर ठराविक रुग्णवाहिका का बोलावली? ठराविक हॉस्पिटलला का नेण्यात आले होते' असंही राणेंनी विचारलं. दिनू मोरया कोण आहे? त्याच्या घरी अनेक मंत्री का जातात. त्याच्या घरी मंत्री आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे?  अधिकारी त्यांना वाचवायचा प्रयत्न का करत आहे.' असंही राणे म्हणाले. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती पार्टी का सोडून गेली होती. सुशांतला धमकी दिली जात होती. हे मुंबई पोलिसांना माहिती नाही का? निष्पाप मुलींचा खून करण्याचे राज्य सरकारला लायसन्स दिले नाही' अशी टीकाही राणेंनी केली.
  Published by:Meenal Gangurde
  First published: