‘दयाबेन’ने शेअर केला आपल्या मुलीचा फोटो, चाहते म्हणाले, ‘वाह’

‘दयाबेन’ने शेअर केला आपल्या मुलीचा फोटो, चाहते म्हणाले, ‘वाह’

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका भारतातील सर्वात जास्त चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. गेली १० वर्ष ही मालिका लोकांचं मनोरंजन करत आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जून- सब टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा या सर्वात लोकप्रिय मालिकेतल्या दयाबेनला अर्थात दिशा वकानीला प्रेक्षक कधी विसरू शकत नाहीत. लवकरच दिशा या शोमध्ये परत येणार असल्याचं म्हटलं जात असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाचीच चर्चा पाहायला मिळते. पण यावेळी तिच्या नावाची चर्चा जरी होत असली तरी युझर तिच्याबद्दल कमी आणि तिच्या मुलीबद्दलच जास्त बोलताना दिसत आहेत. २०१७ मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला होता. प्रेगनन्सीमध्ये दिशाने तारक मेहता मालिकेतून रजा घेतली होती.

Video- सर्वांसमोर अरबाजच्या गर्लफ्रेंडला अर्पिता म्हणाली, ‘ओढणी नीट कर...’

आता दिशाने आपल्या मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. दिशाच्या मुलीचं नाव स्तुती असून मुलीला जास्तीत जास्त वेळ देण्याकडे दिशाचं लक्ष असतं. दिशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ती यावेळी सर्वात जास्त आनंद घेत आहे. लवकरच दिशा तारक मेहता या शोमध्ये परतणार असल्याच्या चर्चा टीव्ही इण्डस्ट्रीमध्ये सुरू आहेत.

'या' पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट

सर्वात जुना शो-

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका भारतातील सर्वात जास्त चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. गेली १० वर्ष ही मालिका लोकांचं मनोरंजन करत आहे. गेली अनेक वर्ष या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० मध्ये जागा मिळवलेली आहे. २ हजाराहूंनही जास्त भाग या मालिकेचे झाले आहेत. यात दिशाने दिलीप जोशी (जेठालाल) यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

दिशा मालिकेच्या निर्मात्यांवर नाराज असल्यामुळे तिने मालिकेतून काढता पाय घेतल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण यात कोणतंच तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं. दिशाला प्रेगन्सीमुळे मोठी सुट्टी हवी होती. पण डेलीसोपसाठी एवढी मोठी सुट्टी देणं फार कठीण असतं. पण निर्मात्यांनी दिशाशी याबद्दल चर्चा केली. यावर लवकरच तोडगा निघेल असंही म्हटलं जात आहे.

SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?

First published: June 4, 2019, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading