• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: बॉलिवूडचा चार्मिंग खलनायक; स्मिता पाटीलनं राज बब्बरसाठी सोडलं होतं कुटुंब

HBD: बॉलिवूडचा चार्मिंग खलनायक; स्मिता पाटीलनं राज बब्बरसाठी सोडलं होतं कुटुंब

80च्या दशकातील तरुणी त्यांच्यामागे वेड्या होत्या. अगदी काही बॉलिवूड अभिनेत्री देखील त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. (Raj babbar smita patil love story) त्यापैकीच एक होत्या स्मिता पाटील.

 • Share this:
  मुंबई 23 जून: राज बब्बर (Raj Babbar) हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. ‘इंसाफ का तराजु’, ‘आज’, ‘वारिस’, ‘मजदूर’, ‘ऐतबार’ (Raj Babbar Movies) यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांद्वारे त्यांनी जवळपास दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज राज बब्बर यांचा वाढदिवस आहे. (Raj Babbar birthday) 69व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राज हे प्रामुख्यानं आपल्या खलनायिकी भूमिकांमुळं अधिक प्रसिद्ध झाले. मात्र तरी देखील 80च्या दशकातील तरुणी त्यांच्यामागे वेड्या होत्या. अगदी काही बॉलिवूड अभिनेत्री देखील त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. (Raj babbar smita patil love story) त्यापैकीच एक होत्या स्मिता पाटील. फिर भी दिल है हिंदुस्तानी!: रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी; पाहा तर स्वॅग 1982 साली भीगी पलके या चित्रपटाच्या निमित्तानं स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून पहिल्याच भेटीत स्मिता प्रेमात पडल्या. त्यावेळी राज यांना दोन मुलं होती तरी देखील दोघांमधील अंतर दिवसेंदिवस कमी होत चलालं होतं. त्यांच्या वाढत्या मैत्रीमुळं राज यांचे आपल्या पत्नीसोबत खटके उडू लागले. त्यांच्या कुटुंबीयांसोबतही त्यांचे मतभेत निर्माण झाले. अशीच काहीशी स्थिती स्मिता पाटील यांच्याही कुटुंबात निर्माण झाली होती. 102 डिग्री तापात फणफणत होती अभिनेत्री; तरीही थंड पाण्यात करावं लागलं शुटींग एका लग्न झालेल्या पुरुषासोबत मुलगी लग्नाचा विचार करतेय हा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. अखेर दोघंही आपल्या कुटुंबीयांपासून विभक्त झाले व एकत्र राहू लागेल. लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहात असल्यामुळं त्याकाळी अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एकत्र नवा संसार थाटला. मात्र त्यांचा हा संसार दिर्घ काळ टीकला नाही. 1986 साली स्मिता पाटील यांचं निधन झालं. त्यानंतर राज बब्बर पुन्हा आपल्या पत्नीसोबत राहू लागले. स्मिता पाटील यांच्यासोबत राहत असताना त्यांना प्रतिक बब्बर हा मुलगा देखील झाला होता. स्मिताच्या मृत्यूनंतर राज यांच्या पहिल्या पत्नीनं त्याचं पालन पोषण केलं. चित्रपटात खलनायक साकारणारे राज बब्बर खऱ्या आयुष्यात मात्र अनेक तरुणींच्या हृदयातील हिरो होते.
  Published by:Mandar Gurav
  First published: