मुंबई 11 जुलै**:** तनिशा मुखर्जी (Tanishaa Mukerji) ही कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. आपल्या मादक अदांद्वारे तिनं प्रेक्षकांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. परंतु तिचं फिल्मी करिअर दिर्घ काळ टिकलं अन् काही वर्षातच ती बॉलिवूडमधून गायब झाली. (Tanishaa Mukerji movie) अभिनेत्री काजोलची ग्लॅमरस बहिण म्हणून तिने बॉलिवूडमध्ये जोरदार एण्ट्री मारली होती. (Why Kajol’s sister failed in Bollywood) परंतु याच ओळखीमुळे तिचं करिअर संपलं असं ती म्हणाली. जर ती काजोलची बहिण नसती तर आज बॉलिवूड सुपरस्टार असती असं तिला वाटतं. ‘मुस्लीम असलो तरी गीता वाचली आहे’; बाबिलनं केली ट्रोलर्सची बोलती बंद हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तनिशानं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं बॉलिवूडमधून गायब होण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “मी सिनेसृष्टीत करिअर करण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझ्या अभिनय कौशल्यावर काम केलं. योग्य पटकथा निवडल्या. नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबतच काम केलं. पण तरीही यश मिळालं नाही. काही गोष्टी तुमच्या नशिबावर देखील अवलंबून असतात. माझी तुलना कायमच काजोलसोबत केली गेली. ती नक्कीच एक उत्तम अभिनेत्री आहे. पण तिने हळूहळू जम बसवला. करिअरच्या सुरुवातीस तिने देखील काही चुका नक्कीच केल्या आहेत. पण त्याच चुकांसाठी माझी खिल्ली उडवली गेली. कदाचित मी काजोलची बहिण नसती तर आज बॉलिवूड सुपरस्टार असती असं कधीकधी वाटतं.” ‘भीक नको मला काम द्या’; लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अभिनेत्याची व्यथा तनिशानं ‘शूssss’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पॉपकॉर्न’ या चित्रपटात ती झळकली. परंतु तिचे दोन्ही चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. दरम्यान 2005 साली ‘नील अँड निकी’ या चित्रपटाद्वारे तिला रिलॉन्च केलं गेलं. या बिग बजेट चित्रपटात उदय चोप्रानं पदार्पण केलं होतं. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. शिवाय तनिशानं यामध्ये केलेल्या हॉट सीन्समुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र तनिशाच्या एकाही चित्रपटाला म्हणावं तसं मिळालं नाही. परिणामी फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का तिच्यावर मारला गेला. अखेर काम मिळत नसल्यामुळे तिनं बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.