जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मुस्लीम असलो तरी गीता वाचली आहे’; बाबिलनं केली ट्रोलर्सची बोलती बंद

‘मुस्लीम असलो तरी गीता वाचली आहे’; बाबिलनं केली ट्रोलर्सची बोलती बंद

‘मुस्लीम असलो तरी गीता वाचली आहे’; बाबिलनं केली ट्रोलर्सची बोलती बंद

मुस्लीम धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान खानच्या मुलानं दिलं जोरदार प्रत्युत्तर

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 11 जुलै**:** दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मुलगा बाबिल खान (Babil Khan) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. अनेकदा तो आपल्या वडिलांबद्दल काहीना काही गंमतीशीर किस्से सांगताना दिसतो. परंतु यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून नेटकरी त्याला मुस्लीम धर्मावरुन ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला आता त्यानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Ive read the Bible, Bhagvad, Gita, Quran) “होय मी मुस्लीम आहे. पण मी कुणारसोबतच गीता आणि बायबल देखील वाचतो” असं म्हणत त्याने या ट्रोलर्सची बोलती बंद केली. सलमान खाननं दिला ‘Bigg Boss’ला नकार? हा अभिनेता होणार नवा होस्ट “मी बायबल, भगवत गीता आणि कुराण तिन्ही गोष्टी वाचल्या आहेत. सध्या मी गुरु ग्रंथ साहेब वाचतोय. मी सर्व धर्मियांचा आदर करतो. धर्माचा उपयोग आपण एकमेकांची मदत करण्यासाठी करायला हवा. हीच खरी धर्माची व्याख्या आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत त्यानं ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी देखील एका मुलाखतीत त्यानं “मी एक माणूस आहे. अन् माणूसकी हाच धर्म मला मान्य आहे. सर्व धर्म आपल्याला हिच शिकवण देतात.” असा टोला ट्रोलर्सला लगावला होता. ‘भीक नको मला काम द्या’; लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अभिनेत्याची व्यथा

null

इरफान खान यांचा मुलगा बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतंच त्याच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. ‘क्वाला’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असणार आहे. अलिकडेच बाबिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली होती. सोबतच त्याने या चित्रपटातला त्याचा फर्स्ट लुक शेअर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात