मुंबई 11 जुलै: लॉकडाउनमुळे देशवासियांची अवस्था फारच बिकट झाली आहे. (Lockdown due to coronavirus) हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशीच काहीशी अवस्था कलाकार मंडळींची देखील झाली आहे. (Unemployment due to coronavirus) प्रसिद्ध अभिनेता बाबा खान हा देखील आर्थिक टंचाईमुळे त्रस्त आहे. खुद्द सलमान खानसोबत काम केलेला बाबा सध्या बेरोजगार आहे. अन् त्याला कोणीतरी काम द्यावं अशी विनंती तो निर्मात्यांकडे करतोय.
सलमान खाननं दिला ‘Bigg Boss’ला नकार? हा अभिनेता होणार नवा होस्ट
बाबा खान हा गेली 15 वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्यानं सलमान खानसोबत जानेमन, बॉडिगार्ड, वीर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसमध्ये देखील तो झळकला होता. परंतु लॉकडाउनमुळे त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. घरखर्च चालवण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे उरलेले नाहित. त्याचं सेव्हिंग बँकांचे EMI भरण्यातच संपलं. परिणामी त्याला सध्या कामाची प्रचंड गरज आहे.
लव्हस्टरी फेम कुमार गौरव का झाले बॉलिवूडमधून गायब? 21 वर्ष काय करतायेत
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यानं स्वत:च्या सद्य परिस्थितीवर भाष्य केल. तो म्हणाला, “गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच माझी अवस्था अशी झाली. मी यापूर्वी भरपूर काम करत होतो. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. परंतु गेलं दिढ वर्ष मी बेरोजगार आहे. मी निर्मात्यांना एकच विनंती करतोय मला भीक नकोय काम द्या. कारण रोजंदारीवरच माझं घर चालतं.” लॉकडाउनमुळे गेल्या काही काळात अनेक कलाकारांची अवस्था अशीच झाली आहे. काहींनी तर रस्त्यावर भाजी, फळे विकून गुजराण करण्यास सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Salman khan, Unemployment