मुंबई 17 एप्रिल**:** प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. ते 59 वर्षांचे होते. शनिवारी पहाटे त्यांना कार्डिअॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक हे तमिळ सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळं शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली. शिवाय उदरनिर्वाह करण्यासाठी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करु लागले. याच दरम्यान 1987 साली मन्नाथी उर्थी वेंडम या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. खरं तर हा चित्रपट फ्लॉप झाला. परंतु विवेक यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनीच केलं. त्यानंतर त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळं त्यांना बॉलिवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते. अवश्य पाहा - भारत-चीन वादाचा निर्मात्यांना फटका; आमिर खाननं दिला चित्रपटात काम करण्यास नकार
RIP #Vivek sir! You will be missed. pic.twitter.com/ZLSFtAbhSm
— Nivin Pauly (@NivinOfficial) April 17, 2021
अभिनयासोबत समाजकार्यातही त्यांनी कायम पुढाकार घेतला. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत केली. नवोदित कलाकारांना चित्रपटांमध्ये काम मिळवून दिली. त्यामुळंच जनमानसात अफाट लोकप्रियता त्यांना मिळाली होती. विवेक यांच्या निधनामुळं चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.