Home /News /entertainment /

'तमाशा लाईव्ह'15 जुलैला होणार प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार सांगितिक मेजवानी

'तमाशा लाईव्ह'15 जुलैला होणार प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार सांगितिक मेजवानी

'तमाशा लाईव्ह' 15 जुलैला होणार प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार सांगितिक मेजवानी

'तमाशा लाईव्ह' 15 जुलैला होणार प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार सांगितिक मेजवानी

'तमाशा लाईव्ह' ( Tamasha Live) या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका सिनेमात नांदी हा प्रकार पहायला मिळणार आहे. सिनेमाची सुरुवात नांदीने होणारा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतील समोर आली आहे. ( tamasha live release date )

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 मे: गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या 'तमाशा लाईव्ह' (Tamash Live) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. येत्या 15 जुलै रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. (tamasha live release date ))  अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर  ‘तमाशा लाईव्ह’चे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर झळकले होते. टिझर पाहून सिनेमाप्रती उत्सुकता चांगलीच वाढली होती.    चित्रपटाविषयीची उत्सुकता इतकी वाढवली की, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू होते. अखेर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आज समोर आली आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा सिनेमा मल्टिस्टारर असून एक वेगळा विषय सिनेमाच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तमाशा लाईव्ह या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका सिनेमात नांदी हा प्रकार पहायला मिळणार आहे. सिनेमाची सुरुवात नांदीने होणारा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. तमाशा लाईव्ह सिनेमा मराठीतील आघाडीचे कलाकार एकत्र येताना दिसणार आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सिनेमाच्या टीझरने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. हेही वाचा - VIDEO: लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, चिमुकली परी करणार खास आवाहन टीझरमधून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. तर सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी यांच्या दमदार डायलॉगनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
    प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ टिझरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तमाशा लाईव्ह’म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगितिक मेजवानी आहे. आपली लोककला जपत त्याला आधुनिकतेचा साज देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.’’ प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या