मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /TMKOC: 'तारक मेहता..'ची लोकप्रियता कायम; 'या' बाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकत ठरली नंबर वन!

TMKOC: 'तारक मेहता..'ची लोकप्रियता कायम; 'या' बाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकत ठरली नंबर वन!

 तारक मेहता का उल्टा चष्मा

तारक मेहता का उल्टा चष्मा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला. एवढंच नाही तर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी देखील शो मधून एक्झिट घेतली. पण तरीही या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला ओळखलं जातं. हा विनोदी शो आपल्या हलक्या-फुलक्या विनोदाच्या जोरावर गेली 14वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध प्रेक्षकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहताना दिसून येतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. दयाबेन, जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शोमध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. एवढंच नाही तर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी देखील शो मधून एक्झिट घेतली. पण तरीही या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामधून अनेक कलाकारांनी  एक्झिट घेतली होती. तेव्हापासून आता लोकांना हा शो पाहणे फारसे आवडत नाही अशी चर्चा होती मात्र, ओरमॅक्सने जारी केलेल्या टीआरपी यादीने सर्व दावे चुकीचे सिद्ध केले आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या टीव्ही शोची टीआरपी यादी आली आहे. ओरमॅक्सच्या या यादीत आश्चर्यकारक नावे पाहायला मिळाली आहेत. तारक मेहता आणि अनुपमा अनेकदा या शर्यतीत आघाडीवर असतात पण यावेळी एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

हेही  वाचा - Singham Again: आता होणार राडा! अजय देवगणच्या 'सिंघम'मध्ये 'सूर्यवंशी' घेणार एंट्री

अनुपमा आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है'  या टॉप मालिकांना मागे टाकत तारक मेहता मालिकेने पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे ही मालिका एवढे वर्ष झाले तरी प्रेक्षकांच्या मनातून जाणार नाही हेच खरं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ormax Media (@ormaxmedia)

या मालिकेत नुकतीच एका नव्या व्यक्तिरेखेने एंट्री घेतली आहे. मालिकेत बागा हे व्यक्तिमत्व चांगलंच लोकप्रिय आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बागाच्या वेगळेपणामुळे या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. बागा प्रमाणेच बावरी ही भूमिका लोकप्रिय झाली. पण ही बावरी काहीच काळासाठी मालिकेत होती. आता ही बावरी पुन्हा मालिकेत एंट्री घेतली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या ट्रॅकमध्ये बावरी तिच्या शहरातून परतली आहे. ती बाघाला बागेत भेटायला सांगते. पण नंतर बावरी त्याच्या... पण नंतर बावरी त्याला संदेश पाठवते की तिला हे नाते तोडायचे आहे. तेव्हापासून केवळ बाघा आणि नट्टू काकाच नाही तर संपूर्ण गोकुळधाम सोसायटी चिंतेत आहे. बावरीच्या या वागण्यामागचे कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. आता प्रत्येकाला आपापल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वात जास्त काळ चालणारा आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा शो रसिकांचे मनोरंजन करत आहे.

First published:

Tags: Tarak mehta ka ooltah chashmah, Tv serial