मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘तारक मेहता’च्या सेटवर कोरोनाचा विस्फोट; आणखी एका कलाकाराला COVIDची लागण

‘तारक मेहता’च्या सेटवर कोरोनाचा विस्फोट; आणखी एका कलाकाराला COVIDची लागण

‘तारक मेहता’मालिका अडकली कोरोनाच्या विळख्यात; सुंदरलालनंतर आणखी एका कलाकाराला झाली कोरोनाची लागण

‘तारक मेहता’मालिका अडकली कोरोनाच्या विळख्यात; सुंदरलालनंतर आणखी एका कलाकाराला झाली कोरोनाची लागण

‘तारक मेहता’मालिका अडकली कोरोनाच्या विळख्यात; सुंदरलालनंतर आणखी एका कलाकाराला झाली कोरोनाची लागण

मुंबई 20 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मंदार चांदवादकर (Mandar Chandwadkar) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah chashmah) या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे (Atmaram Tukaram Bhide) ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्यावर सध्या घरातच उपचार सुरु आहेत.

मंदारनं आज तकला दिलेल्या मुलाखतीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं मान्य केलं. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता. त्यामुळं त्यानं स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली अन् या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या तो आपल्या घरातच उपचार घेत आहे. शिवाय मुंबई महानगर पालिकेनं दिलेल्या प्रत्येत नियमाचं काटेकोरपणे पालन करत आहे. चाहत्यांनी काळजी करु नये माझी प्रकृती स्थिर आहे असा संदेशही त्यानं दिला आहे.

अवश्य पाहा -  ...म्हणून अलका याग्निक आमिर खानवर संतापल्या; धक्का देऊन काढलं होतं स्टुडिओबाहेर

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मालिकेत सुंदरलाल ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मयुर वकानी याला देखील करोनाची लागण झाली होती. यामुळं मालिकेचं चित्रीकरण पुन्हा एकदा थांबणार की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवश्य पाहा -  हार्ट सर्जरीनंतर 'डान्स दिवाने 3' मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा भावुक

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक

महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.

First published:
top videos

    Tags: Covid-19, Covid-19 positive, Entertainment, Vaccinated for covid 19