मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /...म्हणून अलका याग्निक आमिर खानवर संतापल्या; धक्का देऊन काढलं होतं स्टुडिओबाहेर

...म्हणून अलका याग्निक आमिर खानवर संतापल्या; धक्का देऊन काढलं होतं स्टुडिओबाहेर

एकदा तर प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) यांनी त्याला चक्क स्टुडिओच्या बाहेर काढलं होतं. पाहूया काय होता तो गंमतीशीर किस्सा...

एकदा तर प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) यांनी त्याला चक्क स्टुडिओच्या बाहेर काढलं होतं. पाहूया काय होता तो गंमतीशीर किस्सा...

एकदा तर प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) यांनी त्याला चक्क स्टुडिओच्या बाहेर काढलं होतं. पाहूया काय होता तो गंमतीशीर किस्सा...

मुंबई 20 मार्च: आमिर खानला (Aamir Khan) बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जात. कारण तो आपल्या प्रत्येक चित्रपटात सर्वस्व झोकून काम करतो. परंतु त्याच्या याच सवयीमुळं करिअरच्या सुरुवातीस त्याला अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. एकदा तर प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) यांनी त्याला चक्क स्टुडिओच्या बाहेर काढलं होतं. पाहूया काय होता तो गंमतीशीर किस्सा...

तेजाब या चित्रपटातील एक दोन तीन या गाण्यानंतर अलका याग्निक बॉलिवूडमध्ये खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. प्रत्येक निर्माता त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छूक होता. त्याच दरम्यान त्यांना कयामत से कयामत तक या चित्रपटातील ऐ मेरे हमसफर हे गाणं गाण्याची संधी मिळाली. या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु असताना एक तरुण सतत त्यांच्याकडे पाहात होता. त्याच्या अशा पाहण्यामुळं अलकाजींना गाणं गाताना त्रास होता. अखेर वैतागून त्यांनी त्याला स्टुडिओच्या बाहेर काढायला लावलं. नंतर जेव्हा चित्रपटातील सर्व कलाकारांसोबत त्यांची ओळख करवण्यात आली तेव्हा तो आमिर खान होता. चित्रपटातील मुख्य अभिनेता हे त्यांच्या लक्षात आलं. अर्थात आमिरचा तो पहिलाच चित्रपट होता त्यापूर्वी आमिरला कोणी पाहिलेलं नव्हतं त्यामुळं अलकाजींनी देखील त्याला ओळखलं नाही.

अवश्य पाहा - अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं; सांगितलं थक्क करणारं कारण...

आमिरनं भेटल्यानंतर त्या दिवसासाठी त्यांची माफी मागितली. अन् मी तुमच्या गाण्याच्या शैलीचा अभ्यास करत होतो असं तो म्हणाला. अर्थात अलकाजींनी देखील त्याला माफ केलं उलट त्यांनी देखील त्या घटनेसाठी आमिरची माफी मागितली. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरनं हा किस्सा सांगितला होता. हा किस्सा सांगताना त्याला प्रचंड हसू येत होतं.

First published:
top videos

    Tags: Aamir khan, Alka yagnik, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment