जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हार्ट सर्जरीनंतर 'डान्स दिवाने 3' मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा भावुक

हार्ट सर्जरीनंतर 'डान्स दिवाने 3' मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा भावुक

हार्ट सर्जरीनंतर 'डान्स दिवाने 3' मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा भावुक

रेमो डिसूजाला 11 डिसेंबर 2020 ला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 19 मार्च : बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाने (remo dsouza) कलर्स टीव्हीवरील प्रसिद्ध रियालिटी शो’डान्स दिवाने ३’मध्ये (dance deewane 3) उपस्थिती लावली. 20 मार्चला डान्स दिवाने सीझन 3 चा फिनाले होणार आहे. रेमो डिसूझाला 3 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक आला होता. यातून आता तो बराझाला असून हार्ट अटॅकनंतर (heart attack) रेमो डिसूझाचा हा पहिलाच टीव्हीशो आहे ज्यात तो सहभागी झाला आहे. या डान्स शोमधील एक डान्स परफॉर्मंसपाहून रेमो डिसूझा खूपच भावूक झाला. डान्स दिवाने सीझन 3 मध्ये एकास्पर्धकाने आपल्या डान्सच्या माध्यमातून रेमो डिसूझाला आलेला हार्ट अटॅकआणि त्याने कशापद्धतीने याचा सामना केला हा प्रवास दाखवला. कलर्स टीव्हीनेआपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या डान्स परफॉर्मसची झलक दाखवण्यात आली आहे. या स्पर्धकाने रेमोडिसूजाला डेडिकेट करत हा डान्स परफार्मंस केला आहे. या डान्सपरफॉर्मंसची सुरुवात रेमो डिसूजा दिग्दर्शित चित्रपट ‘स्ट्रीट डांसर3D’ मधील गाणं ‘मुकाबला’ पासून होते. त्यानंतर हा स्पर्धक हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेला दिसतो. याच दरम्यान बॅकग्राऊंडमध्ये वॉइस ओव्हर येतो ‘रेमा सर,जो करोडो दिलो की धडकन, उनके दिल मे भी आई अडचन.‘हा डान्स परफॉर्मंस पाहून रेमो खूपच भावुक होतो.

    जाहिरात

    हे ही वाचा- मुंबईत आलिशान घरात रॉयल आयुष्य जगतो कपिल शर्मा; PHOTOS पाहून थक्क व्हाल! रेमो डिसूझा म्हणाला की, ‘मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा झाले आहे की मी भावुक झालो आहे.‘रेमोच्या प्रतिक्रियेनंतर या शोचा जज धर्मेश येलांडेच्या डोळ्यात अश्रू येतात.धर्मेश म्हणतो की, ‘देवाकडे प्रार्थना करतो की पुढे काही झाले तर आधी मला व्हावे नंतर त्यांना व्हावे. त्यांच्यापर्यंत ते पोहचू नये.‘त्यानंतर रेमो डिसूजाने धर्मेशला मिठी मारली. धर्मेश येलांडे रेमोला आपला मार्गदर्शक मानतो. त्यामुळे तो त्याच्या खूपच जवळचा आहे. रेमो डिसूजा हॉस्पिटलमध्येअसताना धर्मेश त्याला भेटायला गेला होता. दरम्यान, रेमो डिसूजाला 11 डिसेंबर 2020 ला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजियोप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery)करण्यात आली होती. रेमो डिसूजा फिटनेसला खूप प्राधान्य देतो. तो आपल्या आरोग्याची खूपच काळजी घेतो. हार्ट अटॅक आला तेव्हा त्याला धक्का बसला होता. दरम्यान, डान्स दिवाने सीझन 3चा फिनाले 20 मार्चला होणार आहे. या शोमध्ये माधुरी दीक्षित,धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया जज आहेत. डान्सर राघव जुयाल हा शो होस्ट करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात