मुंबई, 18 डिसेंबर - तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये (Taarak Mehta ka ooltah chashma )टप्पूची भूमिका करणारा राज (Raj Anadkat) लवकरच शो सोडणार असल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. तारक मेहता का उल्टा चष्मा हा लोकप्रिय टीव्ही शो सर्वांनाच आवडतो. तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शोमध्ये जेठालाल, तारक मेहता, दया, बापूजी असे अनेक कलाकार आहेत. जे लोकांना खूप आवडतात.
गेल्या काही काळापासून हा शो त्यांच्या स्टारकास्टमुळे खूप चर्चेत आहे. टप्पूची भूमिका करणारा राज अनादकट हा शो सोडणार आहे. आता निर्मात्यांनी यामागचे सत्य सांगितलं आहे. निर्मात्यांनी सांगितले , शो सोडण्याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आहे. खरं तर, काही काळापूर्वी तो बबिता जीसोबतच्या अफेअरच्या अफवांमुळे चर्चेत आला होता.
वाचा-Sara Ali Khan ला आई अमृता सिंहनं दाखवला आरसा; अभिनेत्रीनं स्वतः केला खुलासा
दुसरीकडे टप्पूनेही बबिताजीला डेट केल्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे. राजने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, जे माझ्याबद्दल सतत मूर्खपणाचे लिखाण करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही जी खोटी माहिती देत आहात, एकदा त्याच्या परिणामांचाही विचार करा.
वाचा-'Kabhi Khushi Kabhie Gham'मध्ये साकारली होती छोटी करिना; आज 'ती' चिमुकली दिसते..
रिपोर्टनुसार, राज 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोडणार नाही. कारण एका सूत्राने खुलासा केला आहे की, मीडियामध्ये पसरवलेल्या या अफवामुळे निर्माते चांगलेच संतापले आहेत. परंतु अद्याप या अफवेवर निर्माते अधिकृतपणे काहीही बोलत नाहीत कारण त्यांना असे वाटते की यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण राज शोमध्ये टप्पूची भूमिका करत राहणार असल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
सूत्रानुसार, 'काही महिन्यांपूर्वी मुनमुन दत्तानेही शो सोडल्याची अफवा पसरली होती. काही काळापूर्वी मुनमुन आणि राज यांच्या जवळीकतेचीही अफवा पसरली होती. या बातमीने राजला काहीसा त्रास झाला आणि याच कारणामुळे त्याने शोमधून बाहेर पडण्याचा विचार केला.त्याने प्रॉडक्शन हाऊसशीही चर्चा केली पण आता परिस्थिती बदलली आहे. झीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. राजचे टप्पू हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे आणि शो सोडणे हा काही विनोद नाही. त्यामुळे राज हा शो कऱणार असल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, TV serials