Home /News /entertainment /

Sara Ali Khan ला आई अमृता सिंहनं दाखवला आरसा; अभिनेत्रीनं स्वतः केला खुलासा

Sara Ali Khan ला आई अमृता सिंहनं दाखवला आरसा; अभिनेत्रीनं स्वतः केला खुलासा

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या 'अतरंगी रे' (Atarangi Re) चित्रपटामुळे चर्चेत आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री सारा अली खान   (Sara Ali Khan)  सध्या तिच्या 'अतरंगी रे'  (Atarangi Re)  चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तिचा सक्रिय सहभाग असतो. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत झळकणार आहे. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तसेच ती अनेकदा तिच्या नवीन आणि जुन्या फोटोंद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. साराला फॉलो करणाऱ्यांना हे चांगलंच माहीत आहे की सारा आधी खूप लठ्ठ होती. परंतु तिचा बॉलीवूड प्रवास सुरू करण्यापूर्वी तिनं स्वत:ला स्लिम आणि फिट बनवलं आणि त्यासाठी तिला तिची आई अमृता सिंगनं   (Amruta Singh)  सत्याचा आरसा दाखवला होता. सारानं म्हटलं आहे, कि एकदा नाही तर दोनदा तिच्या आईनं तिला कटू सत्याची जाणीव करून दिली होती. सारा अली खाननं नुकताच तिचा वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान खुलासा करत ती म्हणाली, 'तिची आई अमृता सिंगनं तिला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायला हवेत याबद्दल याबद्दल सांगितलं. आरजे सिद्धार्थ कन्ननसोबत झालेल्या संवादात तिनं हा खुलासा केला आहे. सारानं आपल्या मुलाखतीत सांगितलं की, 'जेव्हा मी खूप निरोगी होते, तेव्हा माझ्या आईनं मला म्हटलं की, 'बहिण टुण टुणचं युग संपलं आहे' त्यामुळे जर तुला अभिनेत्री बनायचं असेल तर तुला माहिती आहे...'. ती पुढं म्हणाली की, कोणतीही लाज न बाळगता त्यांनी मला समजावून सांगितलं की मला दुसर्‍या मार्गाने निरोगी राहायचं आहे, हा खरा मार्ग आहे. फक्त सौंदर्यासाठी नव्हे तर मला स्वतःसाठी म्हजेच आरोग्यासाठीही फिट असायला हवं. तेव्हा आईनं मला आरसा दाखवला होता. (हे वाचा:PHOTOS: अनन्या पांडेनं आधी परिधान केली जाळी, नंतर स्वतःलाच केलं Troll) सारा पुढं म्हणाली की, आईने मला दुसऱ्यांदा समजच डोस 'लव्ह आज कल' च्या अपयशानंतर दिला होता. हा चित्रपट अपयशी झाल्यांनतर, आईनं मला म्हटलं होतं, 'हे बघ मी तुझी आई आहे. आम्ही तुझी तुझी टीम आहोत. परंतु आपण आपल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवत असतो. त्यांना जर हा चित्रपट हे काम पसंत पडलं नसेल तर समजून जा तू चूकीच्या मार्गाने जात आहेस'. असं म्हणत आईने मला वेळीच सावरल्याचं सारा सांगते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Sara ali khan

    पुढील बातम्या