Home /News /entertainment /

'Kabhi Khushi Kabhie Gham'मध्ये साकारली होती छोटी करिना; आज 'ती' चिमुकली दिसते अशी

'Kabhi Khushi Kabhie Gham'मध्ये साकारली होती छोटी करिना; आज 'ती' चिमुकली दिसते अशी

करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham) हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची टीम 20 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे.

  मुंबई, 18 डिसेंबर-  करण जोहर   (Karan Johar)   दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम'  (Kabhi Khushi Kabhie Gham)  हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची टीम 20 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. परंतु लोकांना आजही हा चित्रपट पाहायला आवडतो. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj)

  सध्या K3G मधील करीना कपूरचा   (Kareena Kapoor)  'पू'  (Poo)  सीन खूप व्हायरल होत आहे. ज्याची नक्कल करत RRR अभिनेत्री आलिया भट्टनेही सुंदर व्हिडीओ बनवला होता. मात्र, इथे आपण पू अर्थात पूजा म्हणजेच मालविका राज   (Malvika Raj) हिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मालविकानं या चित्रपटात करीना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ती आता मोठी झाली आहे आणि खूपच हॉट दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj)

  मालविका राज देखील 'कभी खुशी कभी गम'ला 20 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. तिनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिला 20 वर्षांपूर्वीचे क्षण आठवल्याचं ती म्हणते. तिनं लिहिलं आहे, '#20yearsofk3g एक एव्हरग्रीन चित्रपट, आयकॉन्ससह स्क्रीन शेअर करणं आणि उस्ताद @karanjohar दिग्दर्शित चित्रपटाचा भाग बनणं म्हणजे... त्या काळी ती माझी ओळख होती आणि आजही आहे'. मालविकानं या चित्रपटात काजोलच्या छोट्या बहिणीची आणि करिनाच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. 'कभी ख़ुशी कभी गम' चित्रपटातील मालविका अर्थातच पूजा आणि लड्डूचा म्हणजेच काविश मुजुमदारचा एक बडबड करणारा सीन खूपच पसंत केला जातो. ज्यामध्ये पूजा लड्डूला 'चंदू के चाचा ने चंदू के चाची को चाँदनी रात में चांदणी चौक में चांदी के चमचे से चटणी चटाई' असा डायलॉग म्हणायला सांगते. मालविका राजने पुन्हा एकदा त्या सीनची पुनरावृत्ती केली आहे. मालविकाने एक व्हिडीओ आपला चित्रपटातील हा सीन शेअर करत पुन्हा एकदा तो डायलॉग म्हटला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच युजर्स मालविकाच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले हॉट अँड बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सर्वांना घायाळ करत असते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Kareena Kapoor

  पुढील बातम्या