जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या टीमला मागावी लागली माफी, लता मंगेशकरांच्या गाण्याबाबत दिली चुकीची माहिती

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या टीमला मागावी लागली माफी, लता मंगेशकरांच्या गाण्याबाबत दिली चुकीची माहिती

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या टीमला मागावी लागली माफी, लता मंगेशकरांच्या गाण्याबाबत दिली चुकीची माहिती

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Makers Apologize) या मालिकेच्या मेकर्सना जाहीर माफी मागावी लागली आहे. दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांच्या (Lata Mangeshkar Songs) गाण्याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मेकर्सवर ही माफी मागण्याची वेळ आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 एप्रिल: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Makers Apologize) या मालिकेच्या टीमला आणि दिग्दर्शकांना जाहीर माफी मागावी लागली आहे. दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांच्या (Lata Mangeshkar Songs) गाण्याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मेकर्सवर ही माफी मागण्याची वेळ आली आहे. मालिकेच्या अलीकडच्याच एपिसोड्समध्ये यातील कलाकार आयकॉनिक गाण्यांवर चर्चा करताना दिसले होते. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्‍या शेवटच्‍या दोन भागांमध्‍ये ‘गोकुलधाम सोसायटी’च्‍या सदस्‍यांनी म्युझिकल नाइटचा आनंद लुटला. या चर्चेदरम्यान, लता मंगेशकर यांचे ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं 1965 मध्ये प्रदर्शित झाले असे म्हटले होते, ही माहिती चुकीची आहे. एपिसोड प्रसारित झाल्यानंतर, निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माफी मागितली. हे वाचा- चाललंय काय? गश्मीर,मनस्वीनंतर आता ‘या’अभिनेत्याने सोडली IMLIE मालिका निर्माते असित कुमार मोदी आणि तारक मेहता का उल्टा चष्माच्या टीमने स्वाक्षरी केलेल्या नोटमध्ये असे लिहिले आहे की, ‘आम्ही आमचे दर्शक, चाहते आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. आजच्या एपिसोडमध्ये, आम्ही अनवधानाने ‘ए मेरे वतन के लोगो’  या गाण्याच्या रिलीजचे वर्ष 1965 असा केला आहे. पण आम्ही याबाबत स्वतःला दुरुस्त करू इच्छितो. हे गाणे 26 जानेवारी 1963 रोजी रिलीज झाले आहे. आम्ही भविष्यात सजग राहण्याचे वचन देतो. तुमच्या समर्थनाची आणि प्रेमाची आम्ही प्रशंसा करतो.’

जाहिरात

अलीकडच्याच एपिसोड्समध्येच हा प्रकार घडला. या एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले आहे की भिडे मास्तर (मंदार चांदवडकर) त्यांचा टेपरेकॉर्डर ‘सरगम ऑर्केस्ट्रा’ दुरुस्त करून आणतात. त्यावेळी त्यावर काही गाणी ऐकण्याचे ठरते. सुरुवातीला हा टेप रेकॉर्डर काम करत नाही पण बागा टेपरेकॉर्डर दुरुस्त करतो. त्यानंतर सर्वजण म्युझिकल नाइटसाठी तयार होतात. यावेळी भारताच्या गानकोकिळा दिवंगत लता मंगेशकरांची गाणी त्यावर प्ले केली जातात. ही गाणी सर्वांनाच जुन्या काळात घेऊन जातात. जेव्हा यावर ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं वाजवलं जातं, त्यावेळी दादाजी या गाण्याच्या रीलिजचे चुकीचे वर्ष सांगतात. हे वाचा-‘ हल्ली चित्रपटांसाठीची निवड Insta followers ची संख्या बघून ठरायला लागल्यात…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत एपिसोडमध्ये त्यांनी सर्वांना माहिती दिली की 1965 मध्ये भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली म्हणून हे गाणे रचण्यात आले होते. यावेळी दादाजींनी सांगितलेले कारण बरोबर होते, पण त्यांनी गाणं तयार करण्यात आलेलं वर्ष चुकीचं सांगितलं आहे. युद्ध 1962 मध्ये झाले होते आणि हे गाणे 1963 च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज झाले. चुकीचे वर्ष सांगितल्यामुळे ‘तारक मेहता..‘च्या टीमला आणि दिग्दर्शकांना माफी मागावी लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात