Home /News /entertainment /

'हल्ली सिनेमात काम Insta followers ची संख्या पाहून मिळते..' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

'हल्ली सिनेमात काम Insta followers ची संख्या पाहून मिळते..' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीची इन्स्टा फॅमेली आता “1.7 million” एवढी झाली आहे. याबद्दलच तिनं एक पोस्ट लिहिली आहे, सध्या तिची पोस्ट चर्चेत आहे.

  मुंबई, 26 एप्रिल-प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्द काही अपडेट असतील ती दिलखुलापणे चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे प्राजक्ताची इन्स्टा फॅमेली (Prajakta Mali instagram) आता “1.7 million” एवढी झाली आहे. याबद्दलच तिनं एक पोस्ट लिहित सर्वांचे आभार मानले आहेत. प्राजक्ता माळीनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काल आपली इन्स्टा फॅमेली "1.7 मिलियन" झाली आहे. तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरचे हास्य काही कमी झालेले नाही..अर्थात प्रेकक्षांच्या ह्रदयात अढळ स्थान निर्माण करणं, टिकवणं, वृद्धिंगत करणं; तेही फक्त चांगल्या कामांच्या जोरावर… असं प्रेम जे मोजता येणार नाही….याच मानसिकतेची आहे मी.. वाचा-लग्नापूर्वी विराजसने शिवानीसाठी घेतला हटके उखाणा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू पण हल्ली चित्रपटांसाठीची निवड आणि इतरही अनेक गोष्टी Insta followers ची संख्या बघून ठरायला लागल्यात…तर…दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न करते…सगळ्या fan clubs, followers चे मनापासून आभार… इतका तडगा fan club बोटांवर मोजण्या इतक्याच लोकांच्या नशीबी आलाय, त्यात मी आहे ह्याचा मला मनापासून आनंद वाटतो.असेच पाठीशी रहा..🙏♥️🌟
  प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्य़जत्रा हा शो होस्ट करताना दिसते. अनेकदा सेटवरील कलाकार तिची फिरकी घेताना दिसतात. प्राजक्ता हे सगळं हासण्यावारी घेत असते. प्राजक्ता पाठोपाठ सांगायचे तर सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट, ह्रता दुर्गुळे, स्वप्नील जोशी, श्रेयस तळपदे यांचे देखील इन्स्टावर मिलियनच्या घरात फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर अनेक सेलेब्स रील्स, फोटो पोस्ट करताना दिसतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Followers, Instagram, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या