मुंबई, 25 फेब्रुवारी: ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोक या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेतून प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळवून दिली आहे. त्यातील एक अभिनेते म्हणजे दिलीप जोशी होय. दिलीप जोशींनी जेठालालची भूमिका साकारत प्रेक्षकांना वेड लावलं आहे. दिलीप जोशी चाहत्यांशी संपर्क राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच या अभिनेत्याने मुंबई मेट्रोची सफर केली आहे. दिलीप जोशी हे टेलिव्हिजनवरील सर्वात आवडते स्टार्सपैकी एक आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मधील जेठालाल गडाची भूमिका करणारा अभिनेता कामात व्यस्त असतो. पण नुकतंच त्यांनी एका खास कामासाठी वेळ काढला आहे. नुकतंच दिलीप जोशी यांनी मुंबईच्या मेट्रो राईडचा आनंद अनुभवण्यासाठी वेळ काढला. राजामौलींच्या RRR चा विदेशात डंका कायम; ऑस्करआधी ‘या’ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर कोरलं नाव दिलीप जोशी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संपर्कात राहतात. वेळोवेळी अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. बर्याच दिवसांनी दिलीप यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी चक्क मुंबईच्या मेट्रोमध्ये राईड केली. या अभिनेत्याने आपली ओळख लपवत मेट्रोचा आनंद घेतला आहे.
आपला मेट्रो राईडचा अनुभव शेअर करताना अभिनेत्याने लिहिलंय कि, “आज मुंबई मेट्रो जॉयराईडसाठी गेलो होतो, आणि मी एवढेच म्हणू शकतो की… बहुत खूब! ज्यांनी हे घडवून आणले त्या प्रत्येकाचे अभिनंदन आणि ज्यांच्या जीवनावर या सेवेचा सकारात्मक परिणाम झाला आहे त्या प्रत्येकाचे अभिनंदन!’ असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दिलीप जोशींचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने ‘आता गडा इलेक्ट्रॉनिक्स ला मेट्रोने जा… ऑटोची झंझट संपली एकदाची’ तर दुसर्याने ‘तुम्ही बबिता जीला सोबत घ्यायला हवे होते, त्यामुळे तिला आनंद झाला असता’ अशा कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नितीश भलुनी या शोमध्ये टप्पूची जागा घेतली आहे. यापूर्वी अभिनेता राज अनाडकत ने ही भूमिका साकारली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिलीप जोशी यांनी शो मध्ये दयाला मिस करत असल्याचे सांगितले होते. तर नवीन दयाबेनच्या एंट्रीविषयी दिलीप जोशी म्हणाले होते की दिशा वकानीच्या जागी नवीन कोणाला कास्ट करायचे की तिला परत आणायचे हे सर्व निर्मात्यांवर अवलंबून आहे.