मुंबई, 15 फेब्रुवारी : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ओळखलं जातं. हा विनोदी शो आपल्या हलक्या-फुलक्या विनोदाच्या जोरावर गेली 14वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. दयाबेन, जेठालालपासून ते पोपटलालपर्यंत सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शोमध्ये मोठा बदल झालेला दिसून येत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. एवढंच नाही तर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी देखील शो मधून एक्झिट घेतली. नुकतीच मालिकेत नवीन टप्पूची एन्ट्री झाली आहे. नुकतंच या निमित्त दिलीप जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दयाबेनबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे. दिलीप जोशी यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पत्रकारांनी दिलीप यांना दयाबेन शो मध्ये कधी परतणार असा प्रश्न विचारला. यावर दिलीप जोशी यांनी उत्तर दिले, ‘हे निर्मात्यांवर अवलंबून आहे. ते ठरवतील की त्यांना नवीन कोणाची जागा घ्यायची आहे की नाही.’ हेही वाचा - Rakhi Sawant: अदिलच्या कुटुंबीयांविषयी राखीचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली ‘त्यांनी त्याचा साखरपुडा…’ ते पुढे म्हणाले कि, ‘एक कलाकार म्हणून मला दया ही व्यक्तिरेखा आठवते. तुम्ही सर्वांनी वर्षानुवर्षे दया आणि जेठाच्या मजेदार सीन्सचा आनंद घेतला आहे. जेव्हापासून दिशाने शो मधून एक्झिट घेतली आहे तेव्हापासून आम्ही देखील तिला मिस करतो. दया आणि जेठा यांच्यातील केमिस्ट्री देखील नाहीशी झाली आहे. सगळ्यांना असंच वाटत आहे. असित भाई नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल माहीत नाही.’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी 2017 पासून बेपत्ता आहे. त्याने हा शो सोडून जवळपास पाच वर्षे झाली आहेत पण आजतागायत निर्मात्यांनी ही रिकामी जागा भरलेली नाही. जवळपास पाच वर्षांआधी या मालिकेतील मुख्य अभिनेत्री दयाबेन म्हणजे दिशा वाकानी हिने ही मालिका सोडली, तेव्हा पासून मालिकेला गळती लागली.
एकामागे एक कलाकार मालिका सोडून गेले. निर्मात्यांनी अनेकदा आश्वासन दिले, पण या मालिकेत दया बेन काही परतली नाही. नटू काका ही निधन पावले. त्या पाठोपाठ सोडी, रोशन तारक मेहता, अंजली भाभी अशा अनेक कलाकारांनी मालिका सोडली. त्यामुळे आता नवे कलाकार घेण्याशिवाय निर्मात्यांपूढे पर्याय उरला नाहीय. अशातच आता मालिकेत दयाबेन परतणार का हे बघणं महत्वाचं आहे.