मुंबई 26 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography Case) सतत राजविरोधात विविध प्रकारचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर शक्तिमान फेम प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी भाष्य केलं. शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) नक्कीच माहित असणार तिचा पती काय करतोय? असा टोला त्यांनी लगावला.
एका फोटोमुळे संपलं माहिकाचं करिअर; Pornstar म्हणून झाली होती ट्रोल
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. त्यामुळे आपण उगाचच काहीतरी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पण पॉर्न तयार करणं गुन्हा आहे. यामुळे आपली तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. त्यामुळे पॉर्नोग्राफीला चाप बसेल. परंतु या प्रकरणात शिल्पा शेट्टीला जबाबदार धरणं योग्य ठरणार नाही. कारण समोर आलेल्या माहितीनुसार तिचा पती हे काळे धंदे करत होता. पण तिला याबद्दल नक्कीच माहिती असणार. तिचा पती दररोज कोट्यवधींच्या उलाढाली करतो. कोट्यवधी रुपये कमावतो अन् त्याला हे पैसे कसे मिळतात हे शिल्पा माहित नाही हे मान्य करणं थोडं कठीण आहे.”
करिअर फ्लॉप पण जगतोय राजासारखा; ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज करतोय काय?
राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Porn video, Raj kundra, Shilpa shetty