मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /TMKOC: बाघाभाई आणि दयाबेनच्या 'या' फोटोवर मिम्सचा पाऊस; चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स वाचून फुटेल हसू

TMKOC: बाघाभाई आणि दयाबेनच्या 'या' फोटोवर मिम्सचा पाऊस; चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स वाचून फुटेल हसू

तारक मेहता का उल्टा चष्मा

तारक मेहता का उल्टा चष्मा

तारक मेहता शोच्या सुपरहिट कलाकारांचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी या थ्रोबॅक फोटोवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी:  तारक मेहता का उल्टा चष्मा हा टीव्ही मालिकेतील एक प्रसिद्ध शो आहे. ज्याचे प्रत्येक पात्र, कथा आणि पंच सर्व चाहत्यांना आवडतात. यामुळेच हा शो 14 वर्षांपासून सुरू असून आजही लोकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, तारक मेहता शोच्या सुपरहिट कलाकारांचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आणि बाघा म्हणजेच तन्मय वेकारिया दिसत आहेत. लोकांनी या थ्रोबॅक फोटोवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हा फोटो नेमका कधीचा आहे, काय आहे या व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घ्या.

दिशा वकाणीने तारक मेहता का उल्टा चष्मा शोला अलविदा केला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिने हा शो सोडला आहे. पण असा एकही दिवस जात नाही जेव्हा प्रेक्षकांना दया भाभीची आठवण येत नाही. सोशल मीडियावर लोक दिशा वकानीला शोमध्ये परतण्याची विनंती करतात. मेकर्सनीही त्याच्यासोबत खूप प्रयत्न केले, पण दिशा तिच्या मुला आणि कुटुंबामुळे हा निर्णय घेत नाहीये. मध्यंतरी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिची अवस्था वाईट झालेली दिसत होती. आता पुन्हा एक असाच फोटो व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - TMKOC: 'तारक मेहता..'ची लोकप्रियता कायम; 'या' बाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकत ठरली नंबर वन!

आता दिशा वाकाणीचा बाघा भाईसोबतचा खास फोटो समोर आला आहे. बाघा म्हणजेच तन्मय वेकारियाने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. त्याने सांगितले की दिशाजीसोबतचा त्यांचा हा फोटो थिएटरच्या काळातील आहे जेव्हा दोघेही रंगभूमीवर नाटकांचे सादरीकरण करायचे.

या फोटोतील दिशा वाकाणी आणि तन्मयचे एक्सप्रेशन असे आहेत की लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले की बाघा बेटा - सेठजींसोबत मजा नाही. म्हणून दया भाभींसोबत बसला आहेस का? त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले, 'जेठालाल कुठे आहे, त्याला लवकर कॉल करा. त्यामुळे सेठजी तुमचा पगार वाढवत नाहीत.'

तुम्हाला सांगायचं तर बाघाभाई हा गुजराती कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील अरविंद वेकारिया हेही गुजराती अभिनेते आहेत. तन्मय 41 वर्षांचा आहे, त्याच्या पत्नीचे नाव मित्सू वेकारिया आहे. दोघांना झिशान आणि दृष्टी ही दोन मुले आहेत. नुकतीच मालिकेत बाघाची प्रेयसी बावरी हिची एंट्री झाल्याने मालिका  पुन्हा रंजक झाली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा सर्वात जास्त काळ चालणारा आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा शो रसिकांचे मनोरंजन करत आहे.

First published:

Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv celebrities, TV serials