मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sidharth-Kiara : ठरलं! सिद्धार्थ ​​आणि कियारा 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; समोर आल्या डिटेल्स

Sidharth-Kiara : ठरलं! सिद्धार्थ ​​आणि कियारा 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; समोर आल्या डिटेल्स

सिद्धार्थ मल्होत्रा -कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा -कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर आता या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  11 ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांच्या लग्नाचा सिझन चालू आहे. नुकतंच अली फजल आणि रिचा चढ्ढा यांचं शानदार लग्न पार पडलं. यांच्यानंतर आता आणखी एका बॉलिवूड जोडप्याच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. ते जोडपं म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी. कॉफी विथ करणमध्ये या दोघांनी केलेल्या खुलास्यानंतर आता  या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर आता या लग्नाबाबत मोठी  अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे हे दोघे पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी या दोघांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, दोघांनीही ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही. यानंतरही चाहत्यांकडून दोघांच्या लग्नाचा अंदाज लावला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढील वर्षी एप्रिलमध्ये दिल्लीत फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची माहिती दोघांच्या जवळच्या सूत्राने दिली आहे. सिडचे कुटुंब दिल्लीत असल्याने लग्नही तिथेच होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ आधी रजिस्टर मॅरेज करतील आणि नंतर कॉकटेल पार्टी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यानंतर कियारा आणि अडवाणी यांचे ग्रँड रिसेप्शनही होऊ शकते.

हेही वाचा - Ram Setu Trailer Out: अक्षयकुमार सिद्ध करू शकेल का रामसेतूचं अस्तित्व; लवकरच उलगडणार रहस्य

अलीकडेच सिद्धार्थ आणि कियारा कॉफी विथ करणच्या सेटवर पोहोचले होते. यादरम्यान करण जोहरशी बोलताना दोघांनीही लग्नाबाबत मुत्सद्दी उत्तर दिले. दोघांनीही उघडपणे याची पुष्टी केली नाही. मात्र ते लग्नासाठी तयार असल्याचे संकेत मिळत होते. अशा परिस्थितीत पुढच्या वर्षी दोघेही लग्नबंधनात  अडकणार असल्याचे बोलले जात आहे.यापूर्वी अशी बातमी आली होती की, सिद्धार्थ-कियारा देखील विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग-दीपिका पदुकोणप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची कॅप्टन बत्राच्या जीवनावर बनलेल्या 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघेही बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. त्यांच्या नात्याची चर्चाही माध्यमांमध्ये रोज रंगत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही नकार दिला नाही. तसेच दोघेही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अशा स्थितीत दोघेही आता रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी तयार झाले असून पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कियारा लवकरच आरसी 15 आणि 'सत्यप्रेम की कथा' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राचा 'थँक गॉड' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे, ज्यामध्ये अजय देवगण देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood actress, Entertainment, Kiara advani, Sidharth Malhotra