मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'जेठालाल'ची क्रश 'बबिता' अखेर पडली प्रेमात; Munmun Dutta ने जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली

'जेठालाल'ची क्रश 'बबिता' अखेर पडली प्रेमात; Munmun Dutta ने जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) बबिता (Babita) हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने (Munmun dutta in love) सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) बबिता (Babita) हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने (Munmun dutta in love) सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) बबिता (Babita) हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने (Munmun dutta in love) सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आली आहे. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकप्रिय असून प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरश: डोक्यावर घेतलं. या मालिकेतलं बबिता (Babita) हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun dutta in love) आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री मुनमुन दत्ताचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियार शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या प्रेमाची कबुली जाहीरपणे दिली आहे.

तारक मेहतामध्ये बबिता ही जेठालालची क्रश असल्याचं तर तुम्हाला माहितीच आहे. याशिवाय खऱ्या आयुष्यात मुनमुन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘टप्पू’ची भूमिका साकारणारा राज अनादकटला (Raj Anadkat)  डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तो तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असल्याने ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना तिने, आपल्याविरोधात चुकीची माहिती पसरवण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. तसंच भारताची लेक म्हणवून घ्यायला लाज वाटत आहे, अशा शब्दांत तिने यावर आपला संताप व्यक्त केला होता.

हे वाचा - Bigg Boss Marathi 3: विशाल निकम जिंकलेल्या रक्कमेचे करणार 'हे' काम

पण आता अखेर मुनमुनने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.  नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने बिनधास्तपणे आपलं प्रेम जाहीर केलं. ती नेमकं कुणावर प्रेम करते, ती व्यक्ती कोण याचा तिने खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ‍♀️ (@mmoonstar)

मुनमुन ज्या व्यक्तीवर प्रेम करते ती व्यक्ती अन्य कोणी नसून मुनमुन स्वतःच आहे. या व्हिडिओमध्ये 'तू प्रेमात आहेस का?' या प्रश्नावर ती. 'हो, मी स्वतःच्या प्रेमात आहे,' असं उत्तर देते. तिचं हे हटके उत्तर प्रेक्षकांना भावलं असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा -पनवेलमध्ये रिक्षा चालवताना दिसला सलमान, चाहत्यांची अशी होती रिअ‍ॅक्शन

मुनमुन दत्ता मूळची पश्चिम बंगालमधली असून, तिचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी दुर्गापूर येथे झाला. 2004 मध्ये तिने ZeeTV वरच्या 'हम सब बाराती' या मालिकेतून पदार्पण केलं होतं. मुनमुनने कमल हासनसोबत 'मुंबई एक्सप्रेस' (2005) चित्रपटातही काम केलं आहे. तसंच 2006 मध्ये 'हॉलिडे'मध्येदेखील ती दिसली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधूनच तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

First published:

Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actress