मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पनवेलच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला Salman Khan, चाहत्यांची अशी होती रिअ‍ॅक्सन

पनवेलच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला Salman Khan, चाहत्यांची अशी होती रिअ‍ॅक्सन

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान  (Salman Khan) कधीही काहीही करत असतो. त्याच्या याच वागण्यामुळे तो सतत चर्चेत तर असतोच पण लक्ष देखील वेधून घेत असतो.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 डिसेंबर- बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान  (Salman Khan) कधीही काहीही करत असतो. त्याच्या याच वागण्यामुळे तो सतत चर्चेत तर असतोच पण लक्ष देखील वेधून घेत असतो. लोकांच्यात मिक्स व्हायला त्याला खूप आवडते. आता सलमनचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. तसं पाहता सलमानच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट नवीन नाही. मात्र तरीदेखील त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते शॉक झाले आहेत.

सलमानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान चक्क रिक्षा चालवताना दिसत आहे. सलमानने नुकताच त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. यासाठी तो पनवेलला त्याच्या फार्महाऊसला आला होता यावेळी त्याचा हा अवतार पाहून चाहते मात्र शॉक झाले आहेत. यामध्ये सलमान पनवेलच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसत आहे. मात्र लोकांना जेव्हा समजले की, रिक्षा सलमान खान चालवत आहे. तेव्हा लोकांनी एकच गर्दी केली आणि मोबईलमध्ये अनेकांनी हा व्हिडिओ शूट केला.

वाचा-सलमान खानला 'या' सेलिब्रेटींकडून मिळाल्या महागड्या भेटवस्तू; पाहा LIST

सलमानची ही रिक्षाची सफारी कशासाठी होती याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओत सलमान साध्या कपड्यात दिसत आहे. निळा ब्लू टी-शर्ट- शॉर्ट्स सलमान खानने घातली आहे. सोबत त्याच्या डोक्यावर टोपी देखील दिसत आहे. कदाचित यापूर्वी असा हॅण्डसम रिक्षा चालक कुणी पाहिला नसेल. यापूर्वीही सलमान खान रस्त्यावर अशाप्रकारे सायकल चालवताना दिसला आहे.

सलमान खान गेल्या आठवड्यात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहोचला होता. वाढदिवसानंतरही सलमान खान पनवेलमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे. सलमान खानच्या वाढदिवसाआधी त्याच्याच पनवेल फार्म हाऊसमध्ये त्याला साप चावला होता. सलमान खानला तीनदा साप चावला. यानंतर भाईजानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलमान खानला काही तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरे झाल्यानंतर सलमानने आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan