मुंबई, 12 मे: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने या मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. असित कुमार मोदी यांच्यासह अभिनेत्रीने प्रोजेक्ट हेड सोहेल रामानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. तिच्या या खुलाश्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. ‘ई टाइम्स’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर मिस्त्रीने दोन महिन्यांपासून शूटिंगला गेली नाही. ती शेवटची 7 मार्च ला सेटवर गेली होती. सोहेल आणि जतिन बजाज यांनी अभिनेत्रीचा अपमान केला होता, त्यानंतर ती सेटवरून परतली होती.या सर्व प्रकरणाबद्दल जेनिफर मिस्त्री बन्सीवालसोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला पण तिंन याबाबत बोलण्यास नकार दिला. पण तिनं शो सोडल्याचं आता स्पष्ट झालं आहे.तिच्या या खुलाश्यानंतर असित मोदींनी देखील त्यांच्याकडून असं काही झालं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. आता या सगळ्यानंतर जेनिफरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
जेनिफरने मागच्या काही काळापासून ती ज्या परिस्थितीला तोंड देत होती त्याबद्दल सांगितले. आता, जेनिफरने शेवटी निर्मात्यांना एक कडक संदेश देत इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणाली की, ‘माझ्या मौनाला माझी कमजोरी समजू नका, मी शांत होते कारण माझ्यात अजूनही संस्कार शिल्लक आहेत. सत्य काय आहे याचा देव साक्षी आहे. लक्षात ठेवा, त्याच्या घरात तुमच्यात किंवा माझ्यात काही फरक उरणार नाही. सगळ्यांचा न्याय तिथे होईल.’ असं ती या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे. Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा सोडू शकते करिअर; कारण सांगत म्हणाली, ‘….तर मी देशही सोडेन’ जेनिफरने ‘तारक मेहता…‘च्या निर्मात्यांवर आरोप केल्यानंतर असित कुमार मोदी स्पष्टीकरण देताना म्हणाले होते की, ‘हा फक्त खोटा आणि बिनबुडाचा आरोप आहे आणि त्यात काहीही तथ्य नाही. ती फक्त आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ती हे सर्व करत आहे. ही माझी खरी प्रतिक्रिया आहे आणि मी सबबी सांगण्याचा किंवा लपविण्याचा प्रयत्न करत नाही. मी खऱ्या आयुष्यात कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.’
असित पुढे म्हणाले, ‘आम्ही तिला शोमधून काढून टाकले. माझ्या दिग्दर्शकाने आणि टीमने तिला शो सोडून जाण्यास सांगितले. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि मी विचार न करता बोलत नाही. मी लवकरच तुम्हाला सर्व पुरावे आणि कागदपत्रे दाखवेन.’ जेनिफरने अनेक प्रसंगांबद्दल खुलासा केला होता. तिला वेळोवेळी सेटवर त्रास दिला गेला. आणि सेटवर खूप द्वेषपूर्ण वातावरण असल्याचंही ती म्हणाली. आता या सगळ्यात पुढे नक्की काय घडणार हे पाहणं महत्वाचं आहे.