मुंबई, 12 मे: अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या कायम चर्चेत असते. अभिनेत्री सध्या बॉलिवूडपासून दूर हॉलिवूडमध्ये नाव कमावत आहे. सध्या तिचं करिअर शिखरावर असून ती संसार देखील व्यवस्थित सांभाळते आहे. प्रियांका नुकतीच आई झाली असून ती करिअर सोबतच मुलगी मालतीला सांभाळत आहे. सध्या प्रियांका तिच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही हॉलिवूडची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. तसेच ती रोमँटिक ड्रामा फिल्म ‘लव्ह अगेन’ मध्येही दिसाली होती. तर येणाऱ्या काळात प्रियांका बॉलिवुडचाही एक बिग बजेट सिनेमा करणार आहे. आपलं करिअर एवढं जोमात असताना क्वचितच कोणीतरी ते सोडण्याचा विचार करू शकतं. पण प्रियांकाने एका खास कारणासाठी वेळ आली तर करिअरचा त्याग करेन असं म्हटलं आहे. एका मुलाखतीतील प्रियंका चोप्राचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. प्रियांकाने आपल्या पालकांचं उदाहरण देत मीही वेळ आली तर करिअर सोडेन असं म्हटलं आहे. पण ती असं नक्की का म्हणाली, तर याचं कारण म्हणजे तिची मुलगी. मालतीच्या सांभाळासाठी प्रियांकाने करिअरला रामराम ठोकण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रियंका चोप्राने सांगितलं की, तिने 17 व्या वर्षी मिस इंडिया हा खिताब जिंकल्यावर तिच्या पालकांनी बरेलीमधील त्याचं काम व्यवस्थित चालू असताना वैद्यकीय प्रॅक्टिस सोडली. यानंतर दोघेही प्रियांकाच्या करिअरसाठी मुंबईत आले. प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्रा हे भारतीय सैन्यात डॉक्टर होते. नंतर, त्यांनी यूपीमधील एका शहरात खाजगी रुग्णालय देखील उघडले, परंतु आपल्या मुलीच्या करिअरसाठी सर्व काही सोडले. प्रियांकाने सांगितले की, जोपर्यंत ती स्वतः आई होत नाही, तोपर्यंत तिने तिच्या करिअरचा त्याग करण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. Adah Sharma: पहिल्या चित्रपटावेळी अदाने प्रेक्षकांना दिलेला डायपर घालून जाण्याचा सल्ला; कारण वाचून म्हणाल… प्रियांकाची आई मधु चोप्रा 40 वर्षांची होती जेव्हा तिने आपल्या मुलीसाठी आपले करियर पणाला लावले होते. प्रियांकाही आता 40 वर्षांची आहे. प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले आहे की, जर तिला तिच्या मुलीसाठी करिअर सोडून दुसऱ्या देशात जाण्यास सांगितले गेले तर ती कोणत्याही पुढचा मागचा विचार करणार आहे. मुलीसाठी ती काहीही करायला तयार आहे.’ ‘फेमिना’शी बोलताना प्रियांका चोप्राने सांगितले की, ‘त्यावेळी आईवडिलांनी माझ्यासाठी आपलं गाव सोडलं. त्यावेळी मी त्यामागचा सिरीयसनेस समजू शकले नव्हते. हे करणं हे पालकांचं कामच आहे असं मला वाटायचं. माझे करिअर महत्त्वाचे आहे. मी माझे पुस्तक लिहू लागेपर्यंत याचा विचारही केला नव्हता. आणि मग माझ्या लक्षात आले की मी आता माझ्या चाळीशीत आहे. आणि जर मला माझे करिअर सोडून एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यास करण्यास सांगितले गेले, तर मी माझ्या मुलीसाठी ते करीन.’
प्रियांकाने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे. प्रियांका म्हणाली की, स्त्रियांचा आदर होईल अशा पद्धतीने मुलांचे संगोपन करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रियंका स्वतःला भाग्यवान समजते की तिला असे पालक मिळाले. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केले आणि आता पती आणि मुलीसह लॉस एंजेलिसमध्ये राहते. प्रियांका आणि निक यांनी जानेवारी 2022 मध्ये मुलगी मालतीला जन्म दिला. नुकतीच ती मुलगी आणि निक जोनाससोबत भारतात आली होती.