मुंबई, 20 ऑक्टोबर- 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. प्रत्येक वयोगटातील लोक या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेमुळे मालिकेतील कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. दयाबेनपासून टप्पूपर्यंत सर्वांनाच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. या मालिकेमुळे कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यातीलच एक म्हणजे टप्पूची भूमिका साकारणारा कलाकार भव्या गांधी होय. परंतु आजही प्रेक्षक त्याला मिस करतात. आणि पुन्हा मालिकेत बघण्याची इच्छा व्यक्त करतात. दरम्यान भव्या मालिकेत परतणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावर आता भव्याने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
तब्बल इतक्या वर्षांनंतर आजही ही विनोदी मालिका लोकांची आवडती मालिका आहे. त्यामुळेच दररोज या मालिकेशी संबंधित बातम्या समोर येत असतात. परंतु यावेळी वृत्त आहे की, मालिकेतील जुना टप्पू म्हणजेच भव्या गांधी 'तारक मेहता' मालिकेत पुनरागमन करणार आहे. परंतु याबाबत बोलताना अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्याचा अद्याप असा कोणताही विचार नाही.या वृत्तांवर विश्वास ठेवला तर भव्या गांधीने मालिकेत परतण्याच्या वृत्ताला पूर्णपणे नकार दिला आहे. म्हणजेच सध्या तर भव्या गांधी मालिकेत परतणार नाहीय.
(हे वाचा:TMKOC : कॅन्सर तंबाखू खाल्ल्याने होतो...'; दिशा वकानी बद्दल मालिकेच्या निर्मात्यांचं मोठं वक्त्यव्य )
ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच लोक ही मालिका आवडीने पाहतात. त्यामुळेच प्रेक्षकांना या मालिकेबाबत लहान-लहान अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं. या मालिकेशी संबंधित अनेक बातम्या समोर येत असतात. दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करणार असल्याची अफवाही बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. परंतु असंच काहीच घडलं नाहीय. त्यानंतर आता टप्पू म्हणजेच भव्या गांधी मालिकेत पुनरागमन करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भव्या गांधीने याबाबत बोलताना म्हटलं आहे की, या सर्व बातम्या खोट्या आहेत. खरं तर,भव्याने गुजराती सिनेमा आणि थिएटरमुळे या मालिकेला रामराम ठोकला होता.
दयाबेन अर्थातच दिशा वकानीप्रमाणेच भव्या गांधींला टप्पूच्या भूमिकेसाठी पुन्हा अप्रोच करण्यात आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत होत्या. परंतु आता भव्या गांधीने याबाबत प्रतिक्रिया देत हे वृत्त फेटाळून लावलं आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेबाबत अनेक अफवा दररोज पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी दिशा वकानी घशाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमीही समोर आली होती. नंतर दिशा वकानीचा भाऊ मयूरने हे वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. ही केवळ एक अफवा पसरवण्यात आल्याचं त्याने सांगितलं होतं.
मालिकेच्या सुरुवातीपासूनच भव्या गांधीने मालिकेत दयाबेन आणि जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारली होती. खोडकर आणि टप्पू प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला होता. परंतु काही वर्षांनंतर टप्पूने ही मालिका सोडली होती. नंतर समोर आलं होतं की, गुजराती चित्रपट आणि थिएटर्ससाठी टप्पूने या मालिकेला रामराम ठोकला होता. त्यांनतर सोढी, अंजली,सोनू, अशा कितीतरी कलाकारांनी मालिकेला रामराम केला होता. दरम्यान नुकतंच तारक ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडली आहे. त्यामुळे चाहते फारच निराश आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv shows