मुंबई 12 ऑक्टोबर : तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधून घराघरात पोहोचलेल्या दयाबेन म्हणजे दिशा वकानीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, तिला घशाचा कर्करोग झाला आहे. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. एवढंच काय तर लोक याबद्दल चर्चा देखील करु लागले आहे.
दिशाबद्दल बोलायचे झाले तर ती २००८ पासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काम करत होती. तिने सप्टेंबर 2017 मध्ये म्रटर्नीटी लिव्ह घेतली आणि त्यानंतर ती 5 महिन्यांनंतर शोमध्ये परतणार असल्याचे बोलले जात होते. पण ती काही परत आलीच नाही.
दिशाने शोमधून सुट्टी घेऊन 5 वर्षे झाली आहेत. नुकताच तिने दुसऱ्या मुलालाही जन्म दिला आहे आणि आता तिला कॅन्सर झाल्याची बातमी देखील समोर आली. असं बोललं जात आहे की शोमध्ये दिशा एक प्रकारचा विशिष्ट आवाजा काढायला लागायचा, ज्यामुळे तिला घशाचा कॅन्सर झाला असावा.
या आवाजावर बोलताना दिशाने अनेक वेळा मुलाखतीत सांगितलं की हे खूप कठीण आहे कारण ती दिवसाचे 11-12 तास सतत शूटिंग करत असते आणि सारखा तोच आवाज ठेवणं आणि त्याच आवाजात बोलणं हे फारच कठीण काम आहे आणि यामुळे कधीकधी तिला त्रास देखील सहन करावा लागतो.
याबद्दल दिशा सोबत इतकी वर्ष काम करणाऱ्या दिलीप जोशी म्हणजेच जेठालालनं वक्तव्य केलं आहे, ते म्हणाले 'मला सकाळपासून सतत फोन येत आहेत. मला वाटतं त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. मी एवढेच म्हणेन की, या सर्व अफवा आहेत. तुम्ही सर्वजण अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका."
परंतू ही बातमी एक अफवा आहे, त्यामुळे त्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका असं दिशा वकानीचा भाऊ मयूरने सांगितलं आहे.
मयूर म्हणाला की 'ही संपूर्ण अफवा आहे आणि मी दिशाच्या चाहत्यांना विनंती करतो की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अजिबात घाबरू नका. मी दिशाच्या संपर्कात आहे आणि या कॅन्सरच्या बातमीत काही तथ्य असेल तर ते जाणून घेणारी मी पहिली व्यक्ती असेन. दिशा पूर्णपणे ठीक आहे आणि खरे सांगायचे तर तिला अफवांना कसे सामोरे जावे हे माहित आहे."
मयुरने याबाबत काहीही सांगितले असे तरी देखील अद्याप या वृत्तावर दिशा वाकाणीचे कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dayaben, Entertainment, Marathi news, Top trending, Viral