मुंबई, 13मे- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. गेल्या चौदा वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु सध्या हा शो चांगलाच वादात सापडला आहे.शोमधील मिसेस सोढी अर्थातच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने मार्चमध्ये हा शो सोडला आहे. इतकंच नव्हे तर तिने शोच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ज्यामुळे शो आणि त्याच्याशी संबंधित सर्व लोक वादात सापडले आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, तिचे बरेच दिवस शोषण होत होते. परंतु ती गप्प बसली कारण तिला वेळेनुसार गोष्टी चांगल्या होतील अशी अपेक्षा होती.अशातच आता ट्विटरवर आता एक ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जेनिफर मिस्त्री बन्सीवालचं कॉल रेकॉर्डिंग असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओमध्ये अभिनेत्री एका व्यक्तीला आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांचा उल्लेख करत आहे. ती म्हणतेय, ‘मी 15 वर्षांच्या घटना लिहिल्या आहेत. जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा ते म्हणाले की, जेनिफर, हे लैंगिक शोषणाचं स्पष्ट प्रकरण आहे. तुमचा निर्माता तुम्हाला त्याच्या खोलीत यायला सांगतो. आम्ही 7 मार्च 2019 रोजी सिंगापूरमध्ये होतो. ती एक मॉडर्न मुलगी आहे, ती येईल असं त्यांना वाटलं असेल’. (हे वाचा: धक्कादायक!तारक मेहता फेम अभिनेत्रीचं लैंगिक शोषण; शोच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल ) या ऑडिओ कॉलमध्ये ती पुढे म्हणते, ‘7 मार्च 2019 रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानी मला 8 मार्चला सांगितले की आज लग्नाचा वाढदिवस नाहीय ना, आज काही पश्चाताप नाहीय, मग रुममध्ये ये. मी भीतीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेले. ते दुसऱ्या दिवशी मला म्हणाले तुझे ओठ खूप सुंदर आहेत, मला पकडून चुंबन करावेसे वाटते. मी घाबरुन थरथरत होते. मी माझ्या दोन सहकाऱ्यांना याबाबत सांगितले आहे. पण मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. त्यांना सांगावे लागले तर ते आपोआप पुढे येतील. एका सहकाऱ्याने त्याच्यावर आरडाओरडादेखील केला की, तू पुन्हा पुन्हा अत्याचार का करतोस’असं म्हणत.
Shocking. 😲 #TarakMehtaKaOoltahChashmapic.twitter.com/646U9sodtR
— Prayag (@theprayagtiwari) May 12, 2023
जेनिफरला सुरुवातीला भीती वाटत होती की, शो निर्माते तिचे पूर्वीचे पैसे थांबवतील. ती पुढे म्हणते, ‘मी काही जेठालाल नाही जे प्रेक्षकांना फरक पडेल. शोला 15 वर्षे देऊनही मी माझ्या मुलीला 2 तास देऊ शकत नाही. त्यामुळे येथे काम करणं व्यर्थ आहे. मी माझ्या पतीला सांगितलं, तर तो म्हणाला तू परत निघून ये. पण मी त्याला म्हणाले निर्माते माझे साडे तीन महिन्यांचे पैसे थांबवतील. तर त्यावर माझा पती म्हणाला ते पैसे तू सोडून दे त्यांना दान करुन टाक आणि निघून ये’.
या सर्व प्रकरणाबाबत पुढे बोलताना जेनिफर म्हणाली की, या सर्वात तिला तिच्या पतीने हिंमत दिली होती. त्यामुळेच अभिनेत्रीने शो सोडण्यास होकार दिला होता. आणि तिच्या निर्णयाबद्दल दिग्दर्शकालाही कळवलं. पण तिथेही तिच्यासोबत गैरवर्तन केलं गेलं. आणि शेवटी ती म्हणते, ‘जेव्हा मी सोडू लागलो तेव्हा शोचे कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांनी मला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने शोचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.