**मुंबई, 11 मे- ‘**तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोमध्ये ‘रोशन सिंह सोढ़ी’च्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. असित कुमार मोदी यांच्यासह अभिनेत्रीने प्रोजेक्ट हेड सोहेल रामानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. ‘ई टाइम्स’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर मिस्त्रीने दोन महिन्यांपासून शूटिंगपासून स्वत:ला दूर ठेवले होते. 7 मार्च ला ती शेवटची सेटवर दिसली होती. सोहेल आणि जतिन बजाज यांनी अभिनेत्रीचा अपमान केला होता, त्यानंतर ती सेटवरून परतली होती.या सर्व प्रकरणाबद्दल जेनिफर मिस्त्री बन्सीवालसोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला पण तिंन याबाबत बोलण्यास नकार दिला. पण तिनं शो सोडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. ‘माझा शेवटचा एपिसोड 6 मार्चला आला असल्याचं जेनिफरनं सांगितल. सेटवर प्रोजेक्ट हेड सोहेल रामानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतीन बजाज यांनी माझा अपमान केल्याचं तिनं सांगितलं. नेहा कक्कडला आवाजनं वेड लावणाऱ्या गायकाचा 29 व्या वर्षी मृत्यू 7 मार्चला माझ्या लग्नानचा वाढदिवस होता. त्या दिवशी होळी होती, त्यादिवशीच हा प्रकार घडला आहे. अभिनेत्री म्हणाली, मी चार वेळा सुट्टीसाठी विचारलं, पण त्यांनी मला सुट्टी दिलं नाही कारण त्यांना मला जाऊ द्यायचं नव्हतं. सोहेलने जबरदस्तीने माझी गाडी थांबवली. मी त्यांना असेही सांगितले की, मी या मालिकेसोबत 15 वर्षे काम केले आहे आणि माझ्यावर अशी सक्ती करू शकत नाही. यानंतर सोहेलने मला धमकी दिली. मी असित कुमार मोदी, सोहेल रामानी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. ’ जेनिफरनं पुढे म्हणाली की, मी टीमला आधीच सांगितले होते की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मला त्या दिवशी हाफ डे पाहिजे. माझी एक मुलगीही आहे जी होळीसाठी माझी वाट पाहत होती. पण निर्मात्यांनी मला जाऊ दिलं नाही. दोन तासांच्या विश्रांतीनंतर परत येईन, असेही मी सांगितले. पण त्यांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. ते अनेकदा मेल पुरूष कलाकारांना कामत सुटत देतात पण महिलांना नाही. या शोमधील लोक अ पुरुषी हुकुमत गाजवणारे आहेत. जतीनने जबरदस्तीने माझी गाडी थांबवली.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे. ही घटना 7 मार्च रोजी घडली होती. मला वाटले की हे लोक मला फोन करतील. पण 24 मार्चला सोहेलने मला नोटीस पाठवली की मी शूटिंग सोडून गेलो आहे, त्यामुळे तो माझे पैसे कापत आहे. त्यांनी मला घाबरवलं असल्याचे देखील अभिनेत्रीनं सांगितलं.