Home /News /entertainment /

‘सीतेच्या भूमिकेसाठी मानधन वाढवलं ते योग्यच केलं’; तापसीनं केली करीनाची पाठराखण

‘सीतेच्या भूमिकेसाठी मानधन वाढवलं ते योग्यच केलं’; तापसीनं केली करीनाची पाठराखण

ट्रोलर्सच्या या मागणीवर आता अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं प्रतिक्रिया दिली आहे. करीनानं अधिक पैसे मागितले ते योग्यच केलं अशी पाठराखण तिनं केली आहे.

    मुंबई 1 जलै: पुनरागमन करणाऱ्या करीना कपूरनं (Kareena Kapoor) सीतेची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 12 कोटी रुपयांचं मानधन मागितलं. सुरुवातीला तिनं आठ कोटी रुपयांची डील केली होती परंतु आता ती या प्रोजेक्टसाठी तिनं अधिक पैसे मागितले आहेत. मात्र तिच्या या निर्णयावर काही प्रेक्षक संतापले अन् त्यांनी करीनाला या चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली. ट्रोलर्सच्या या मागणीवर आता अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं प्रतिक्रिया दिली आहे. करीनानं अधिक पैसे मागितले ते योग्यच केलं अशी पाठराखण तिनं केली आहे. पूजा बत्रासारखी हुबेहुब दिसणारी ही तरुणी आहे तरी कोण? आहेत लाखो फॉलोअर्स बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तापसीनं या 12 कोटींच्या प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “एखादा अभिनेता जेव्हा अधिक पैसे मागतो तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं. म्हणे त्याचा दर्जा आता वाढला आहे. पण एखाद्या अभिनेत्रीनं मानधन वाढवलं तर तिच्यावर टीका करतात. हा लिंगभेद केला जात आहे. अभिनेत्री देखील तितकीच मेहनत करतात हे विसरता कामा नये. काही लोकांचा इगो दुखावला गेलाय त्यामुळं ते टीका करतायेत. करीनानं मानधन वाढवून योग्यच केलं.” गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है! आधीच मिळाली होती हत्येची टीप ‘तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतो’, करीना कपूरला धमकी नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिलं आहे. जर करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला गेला तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. “वारंवार हिंदू धर्मावरच चित्रपट का तयार केले जातात? शिवाय या चित्रपटांमध्ये मुस्लीम कलाकारांना महत्वाच्या भूमिका दिल्या जातात. ही मंडळी हिंदू देवतांच्या नावावर कोट्यवधी रुपये कमावतात. आणि नंतर आमच्याच देवांवर आणि संस्कृतीवर टीका करतात. यापूर्वी करीना आणि तिचा पती सैफ अली खान यानं हे प्रकार अनेकदा केले आहेत. त्यामुळं अशा लोकांना आम्ही सीतेसारखी पवित्र भूमिका साकारु देणार नाही. आणि जर करीनासोबत हा चित्रपट तयार केला गेला तर त्याला विरोध केला जाईल. आज आम्ही यासंबंधी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.” बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानं प्रसार माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Kareena Kapoor, Star celebraties, Taapsee Pannu

    पुढील बातम्या