जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है! आधीच मिळाली होती हत्येची टीप

गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है! आधीच मिळाली होती हत्येची टीप

गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है! आधीच मिळाली होती हत्येची टीप

गुलशन कुमार की विकेट गिरने वाली है असा एक फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी तत्काळ हालचाली केल्या गेल्या परंतु त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 जुलै**:** गुलशन कुमार (Gulshan Kumar) हे संगीत विश्वातील एक मोठं नाव होतं. त्यांनी सुरु केलेली टी सीरिज (T-Series) आज भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. अंडरवर्ल्डला खंडणी न दिल्यामुळं 1997 साली मंदिराबाहेर तब्बल 16 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. (Gulshan Kumar Murder Case) आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची हत्या होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती. गुलशन कुमार की विकेट गिरने वाली है असा एक फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी तत्काळ हालचाली केल्या गेल्या परंतु त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस कमिश्मर राकेश मारिया (Rakesh Maria) यांनी IANS ला दिलेल्या मुलाखतीत गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी या फोनचा प्रसंग सांगितला. गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी हायकोर्टाचा निर्णय, आरोपीची याचिका फेटाळली काय म्हणाले राकेश मारिया**?** “सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है अशी माहिती मला माझ्या संपर्कात असलेल्या एका खबऱ्याने दिली होती. मी त्याला विचारलं ‘कौन गिरानेवाला है विकेट?’ तर त्याने उत्तर दिलं “अबू सालेम, उसने अपने शूटर्स के साथ सब प्लान नक्की किया है गुलशन कुमार साहाब रोज घरसे निकलके पहले एक शिव मंदिर जाता है. वहींपे काम खतम करने वाले है..” अशी माहिती मला खबऱ्याने दिली. ज्यानंतर मी त्याला विचारलं की ‘खबर पक्की है क्या?’ तर तो म्हणाला “साहब एकदम पक्की खबर है, नहीं तो आपको कैसे बताता?” मी त्याला म्हटलं की ‘और कुछ खबर मिले तो बताना’ असं म्हणून मी त्याचा फोन ठेवला आणि विचारात पडलो की आता काय करावं?” Me Too: ‘दिग्दर्शकाला मांड्या आणि क्लिवेज पाहायचं होतं’;आश्रम फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा “दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहिला फोन महेश भट्ट यांना केला. त्यांना विचारलं की तुम्ही गुलशन कुमार यांना ओळखता का? ते म्हणाले हो.. मी त्यांचा एक चित्रपट दिग्दर्शित करत आहे. सकाळीच माझा फोन आलेला पाहून महेश भट्ट हे काहीसे चकीत झाले. मात्र त्यांनी मला गुलशन कुमार हे रोज शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात ही माहिती दिली. त्यानंतर मी तातडीने गुन्हे शाखेला कळवलं की गुलशन कुमार यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करा. मात्र तोपर्यंत त्यांची हत्या झाली होती.” राकेश मारिया यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा फार जवळून अनुभव घेतला आहे. त्यांनी अनेक कुप्रसिद्ध गुंडांना गजाआड पाठवलं आहे. मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांना संपवण्यात त्यांचा मोठा हात होता. करिअरमध्ये आलेला हा संपूर्ण अनुभव यांनी लेट मी से ईट या पुस्तकात विस्तृत स्वरुपात लिहिला आहे. यामध्ये त्यांनी गुलशन कुमार हत्या प्रकरणाचा देखील उल्लेख केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात