मुंबई, 26 जुलै: सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वरदा ठिगळे. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी ही एक मालिका. अभिनेत्री स्वरदानं तिच्या अभिनयानं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या सहज सुंदर, उत्कृष्ट संवादाने तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. फार कमी वेळात स्वरदा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या या यशात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे स्वरदा तिचं घर घेण्याचं स्वप्न पूर्णं केलं आहे. स्वरदानं नुकतंच मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर घराचे फोटो आणि खास पोस्ट लिहीत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. ‘माझं स्वत:चं कायमचं सुखाचं ठिकाण, माझ सुंदर घर. मुंबईत घराचं स्वप्न, आपली ओळख बनवण्याचं स्वप्न आणि स्वप्न आता सत्यात उतरत आहे. स्वत:वर विश्वास ठेवा, सगळं काही ठिक होईल’, अशी सुंदर पोस्ट लिहित स्वरदानं ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्याचप्रमाणे तिनं आई बाबांबरोबरचे घराचा ताबा घेतानाचे आणि घराबाहेरचे फोटोही शेअर केले आहेत. नवं घर घेतल्यानंतर स्वरदाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. ती फार आनंदी आहे. त्याचप्रमाणे मुलीनं इतक्या कमी वयात स्वत:चं घर घेतल्याचं अभिमानही तिच्या आई वडीलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
स्वरदा ठिगळेनं स्वराज्या सौदामिनी ताराराणी या मालिकेत ताराराणींची प्रमुख भूमिका साकारली. हेही वाचा - Ananya Film: वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियननं ‘अनन्या’ला दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO तिच्या या भूमिकेच अनेकांनी कौतुक केलं.अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशनची निर्मिती असलेल्या या मालिकेत स्वरदा अनेक मोठ्या कलाकारांकडून अभिनयाचे धडे देखील गिरवता आले. तिनं ताराराणींच्या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली मेहनत मालिकेत वेळोवेळी पाहायला मिळाली. तिचा नऊवारीतील वावर देखील फार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. स्वरदानं स्वराज्य सौदामिनी या मालिके आधी ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेत ‘शुभ्रा’ची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ या हिंदी मालिकेतही तिनं काम केलं आहे. तसंच ‘थोडं तुझं थोडं माझं’ या सिनेमातून तिनं सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.