जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कलाकाराचे निधन, साकारली होती 'अब्दुल्ला दळवी'ची भूमिका

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कलाकाराचे निधन, साकारली होती 'अब्दुल्ला दळवी'ची भूमिका

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील कलाकाराचे निधन, साकारली होती 'अब्दुल्ला दळवी'ची भूमिका

‘झी मराठी’वरील (Zee Marathi) स्वराज्य रक्षक संभाजी (Swarajya Rakshak Sambhaji) या मालिकेत ‘अब्दुल्ला दळवी’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे 14 सप्टेंबर रोजी निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 सप्टेंबर : मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार 2020 हा वर्षामध्ये हे जग सोडून गेले आहेत. या कलाकारांची अशी अकाली एक्झिट चटका लावणारी आहे. काही कलाकार मालिका-सिनेमांमधून अगदी घराघरात पोहोचले आहेत. ‘झी मराठी’वरील (Zee Marathi) स्वराज्य रक्षक संभाजी (Swarajya Rakshak Sambhaji) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. दरम्यान या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या एका कलावंताचे 14 सप्टेंबर रोजी निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता प्रशांत लोखंडे (Actor Prashant Lokhande) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या मालिकेमध्ये त्यांनी अब्दुल्ला दळवी ही भूमिका साकारली होती. मुरूड जंजिऱ्याहून कोंडाजी बाबांना घेऊन जाण्यासाठी मदत करणारा अब्दुला दळवी होता. त्याचे पात्र प्रशांतने साकारले होते. 14 सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. या उमद्या कलाकाराच्या जाण्याने मालिका विश्वातून आणि त्याच्या सहकलारांनी हळहळ व्यक्क केली आहे.

जाहिरात

(हे वाचा- अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवली, वाचा नेमकं काय आहे कारण ) प्रशांतने स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत बाजी घोरपडे ही भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारली होती. त्याच्या या ऐतिहासिक भूमिका नेहमी स्मरणात राहतील अशा प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. जगदंब क्रिएशनकडून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ‘बाद मैं कटकट नको’ या त्याच्या प्रसिद्ध झालेल्या डायलॉगची देखील अनेकांनी यावेळी आठवण काढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात