Home /News /entertainment /

अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवली, वाचा नेमकं काय आहे कारण

अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवली, वाचा नेमकं काय आहे कारण

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सर्व चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    शिखा धारीवाल, मुंबई, 16 सप्टेंबर : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सर्व चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व बंगल्यावर असणाऱ्या सिक्योरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. संसदेत समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी बच्चन परिवाराला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. परिणामी ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळते आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा जुहू स्थित बंगल्याबाहेर देखील मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. (हे वाचा-IPL 2020 : या सीझनमध्ये मयंती लँगरला टक्कर देणार ही ऑस्ट्रेलियन अँकर) त्यावर उत्तर देताना मंगळवारी जया बच्चन यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. दरम्यान याप्रकणी अभिनेत्री कंगना रणौत हिने जया बच्चन यांना काही तिखट सवाल करत त्यांच्यावर टीका केली आहे. तर शिवसेनेने जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. (हे वाचा-'रिया को फसाओ असा ड्रामा सुरू', अभिनेत्रीसाठी बॉलिवूडकरांचे माध्यमांना खुले पत्र) ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी याबाबत चौकशीची मागणी करत बॉलिवूडमधील अंमली पदार्थाच्या व्यसनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पाकिस्तान आणि चीनने देशातील तरूणांना संपुष्टात आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर 'कुछ लोक जिस थाली में खाते है उसी में छेद करते हैं', असं म्हणत जया बच्चन यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करू नका असे आवाहन जया बच्चन यांनी केले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Ravi Kishan

    पुढील बातम्या