मुंबई 19 मार्च: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. “या महिला फाटके कपडे घालून का फिरतात? हे कसले संस्कार?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (priyanka Gandhi) यांनी संताप व्यक्त केला. अन् त्यांची ही प्रतिक्रिया आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara bhasker) हिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. “अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत” अशा आशयाचं ट्विट करत प्रियांका गांधी यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. या फोटोची खिल्ली उडवत स्वरा भास्कर हिनं प्रियांका गांधींच्या ट्विटला आपला पाठिंबा दिला आहे. हे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अवश्य पाहा - या अभिनेत्यानं सुरु केली फाटक्या जीन्सची फॅशन; आज महिलाही करतात फॉलो
अवश्य पाहा - बॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत**?** एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं होतं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं.